agriculture news in marathi, Ajit Pawar says, delay in declare drought, Maharashtra | Agrowon

दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः अजित पवार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी करत आहे. तसेच केवळ भावनिक मुद्द्यांना हात घालून निवडणुका लढविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. २२) केली. तसेच कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचाही पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी करत आहे. तसेच केवळ भावनिक मुद्द्यांना हात घालून निवडणुका लढविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. २२) केली. तसेच कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचाही पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

राज्यात परतीचा पाऊस न पडल्यामुळे अनेक जिल्ह्यांत व तालुक्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असूनही राज्य शासनातर्फे दुष्काळ जाहीर केला जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला निधी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा शिर्डीतील कार्यक्रमात केली. मात्र, केंद्राच्या समितीने पाहणी केल्यानंतरच दुष्काळ जाहीर केला जाईल, असे राज्य शासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र, सत्तेत असणऱ्या सत्ताधारी पक्षाने असा आरोप करणे योग्य नाही.

शिवसेनेच्या नेत्यांनी याचा जाब विचारणे आवश्यक आहे.
‘‘भाजप सरकारच्या वतीने टँकरमुक्त महाराष्ट्राची वल्गना करण्यात आली. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, जलयुक्त शिवारची कामे झाली, त्याच ठिकाणी भूगर्भातील पाणीपातळी एक ते दीड मीटरने कमी झाली असल्याचा अहवाल शासनाच्याच भूजल सर्वेक्षण विभागाकडून दिला जात आहे. त्यामुळे शासनाचे जलयुक्त शिवार अभियान पूर्णपणे अपयशी झाले आहे. कुठे भ्रष्टाचार झाला याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे,’’ असेही अजित पवार म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...