agriculture news in Marathi, Ajit pawar says, gave per heacter 50 thousand help , Maharashtra | Agrowon

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्या : अजित पवार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

मुंबई: राज्यातील दुष्काळ परिस्थिती पाहण्यासाठी केंद्राचे पथक येणार असल्याची घोषणा सरकारने केली. दुष्काळाने शेतकरी हतबल झाला आहे. आत्महत्या झाल्यानंतर केंद्राचे पथक पाहणीला येणार का? असा संतप्त सवाल करीत दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्रीय पथकाला विशेष विमानाने घेऊन या. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्या, भारनियमन बंद करा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. २५) केली.

मुंबई: राज्यातील दुष्काळ परिस्थिती पाहण्यासाठी केंद्राचे पथक येणार असल्याची घोषणा सरकारने केली. दुष्काळाने शेतकरी हतबल झाला आहे. आत्महत्या झाल्यानंतर केंद्राचे पथक पाहणीला येणार का? असा संतप्त सवाल करीत दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्रीय पथकाला विशेष विमानाने घेऊन या. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्या, भारनियमन बंद करा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. २५) केली.

पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली. ‘‘या वर्षीचा दुष्काळ १९७२ पेक्षा भीषण आहे. जुन्या पद्धतीने दुष्काळ जाहीर करावा, याबाबतचे पत्र धनंजय मुंडे यांनी जानेवारी महिन्यातच राज्य सरकारला दिले होते. पण सरकारचे क्लिष्ट नियोजन पाहता याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. राज्यातील सध्याची हवामान परिस्थिती पाहता पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी, धरणासाठी, जनावरांना पिण्यासाठी किती पाणी लागेल, याचे नियोजन सरकारने आताच केले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

‘‘अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरवात व्हायला हवी होती. परंतु  स्मारकाच्या तिथे पुन्हा जाऊन नारळ फोडण्याचे कारणच नव्हते, त्यामुळे पंतप्रधानांनी केलेले शिवस्मारकाचे भूमिपूजन कोणाला आवडले नव्हते काय,’’अशी टीका श्री. पवार यांनी केली. या वेळी धनंजय मुंडे, नवाब मलिक उपस्थित होते. 

`तेव्हा शिवसेना गप्प होती ’
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्याबाबत सरकार जेव्हा बैठक घेत होते तेव्हा शिवसेनेचे सुभाष देसाई त्या वेळी उपस्थित होते. खरंतर त्याचवेळी त्यांनी विरोध करत बैठकीतून उठून जायला पाहिजे होते. ते बैठकीत केवळ डोसा खायला गेले होते का?  किंमत कमी करण्यामागे सरकारचा नेमका घोटाळा काय आहे याबाबत आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवू. नियम धाब्यावर बसवून शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम घेतल्यामुळे बुधवारी दुर्घटना घडली, असे विखे पाटील म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...