agriculture news in marathi, ajit pawar says government ignore drought situatuion, pune, maharashtra | Agrowon

'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील पाणीसाठा कमी झाला अाहे. अजून सात महिने जायचे आहेत. येत्या काही दिवसांत पाणी टंचाई वाढून मोठ्या संख्येने टँकर सुरू करावे लागतील. लोकांच्या हाताला काम द्यावे लागेल, जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागतील. मात्र सरकार त्यासाठी पावले उचलताना दिसत नाही. राज्यात दुष्काळाची दाहकता किती आहे, हे सरकारच्या लक्षात येत नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केली.

पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील पाणीसाठा कमी झाला अाहे. अजून सात महिने जायचे आहेत. येत्या काही दिवसांत पाणी टंचाई वाढून मोठ्या संख्येने टँकर सुरू करावे लागतील. लोकांच्या हाताला काम द्यावे लागेल, जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागतील. मात्र सरकार त्यासाठी पावले उचलताना दिसत नाही. राज्यात दुष्काळाची दाहकता किती आहे, हे सरकारच्या लक्षात येत नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केली.

जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीचा आढावा घेण्यासाठी नुकत्याच (बुधवारी) झालेल्या बैठकीनंतर श्री. पवार बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील या वेळी उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, की राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने ज्यांची खरिपाची पिके गेली आहेत, त्यांना ५० हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली होती. मात्र, दुष्काळचा आढावा घेण्यासाठी आता केंद्राचे पथक येणार, पाहणी करणार मग दुष्काळ जाहीर होणार अशी स्थिती आहे. खरे तर, राज्यात किती भयानक दुष्काळ आहे याचा अंदाज अद्याप सरकारला नाही. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी धरणे शंभर टक्के भरलेली असतात. त्यानुसार पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र, परतीचा पाऊसच न झाल्याने अात्ताच धरणांमधील दहा ते वीस टक्के पाणी वापरले गेले आहे. त्यामुळे येत्या काळात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.

दुष्काळ आढाव्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दहा तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यापुढे शहर आणि ग्रामीण यामध्ये सुुरू असणारा पाण्याचा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. मी दहा वर्षे पालकमंत्री होतो, त्या काळात हा वाद कधीच होऊ दिला नाही. मात्र, आता पाण्याचे नियोजनच नाही, अशी टीका अजित पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव न घेता केली.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...