अभ्यासाच्या नावाखाली सरकारकडून दिशाभूल ः अजित पवार

हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने ग्रामस्थांनी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, चित्रा वाघ, अजित पवार, राजेश टोपे यांनी सहभाग घेतला.
हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने ग्रामस्थांनी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, चित्रा वाघ, अजित पवार, राजेश टोपे यांनी सहभाग घेतला.

वर्धा ः बोंड अळीमुळे कापूस, तर दरामुळे सोयाबीन उत्पादक उद्ध्वस्त झाला आहे. त्यानंतरही त्यांना दिलासा देण्याकरिता उपाय योजना करण्याऐवजी अभ्यासाच्या नावाखाली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्जमाफीची घोषणा केली; परंतु प्रत्यक्ष लाभ कोणालाच मिळाला नाही. त्यावरून या सरकारची काही देण्याची मानसिकता नसल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.  हल्लाबोल यात्रा सोमवारी (ता. ४) देवळी तालुक्‍यात पोचली. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. कापूस उत्पादक पट्ट्यात या वर्षी अस्वस्थता आहे.  या वेळी अजित पवार म्हणाले, की बोंड अळीच्या नुकसानापोटी काही अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेतले जात आहेत. या अर्जांचे पुढे काय होणार, मदतीसाठी कोणत्या निकषांचा अवलंब होणार याविषयी कोणालाच माहिती नाही. कधीकाळी कापसाचे दर साडेपाच ते सहा हजार रुपये प्रतिक्‍विंटल होते. या सरकारच्या काळात ते चार हजारावर आले. सोयाबीन तीन हजार रुपयांवरून २४०० रुपये प्रतिक्‍विंटलने विकले जात आहे. शेती आणि शेतकरी या दोघांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा प्रयत्न या सरकारकडून होत आहे.  या वेळी खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या चित्रा वाघ, सुरेश देशमुख, समीर देशमुख, ॲड. सुधीर कोठारी, राजू तिमांडे उपस्थित होते. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने रस्त्यालगतच्या शेतांत असलेल्या शेतकऱ्यांशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संवाद साधला. त्यांच्याकडून त्यांचे प्रश्‍न जाणून घेण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com