agriculture news in Marathi, Ajit Pawar says government should interfere in sugar rate issue, Maharashtra | Agrowon

साखर दरप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा ः अजित पवार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जानेवारी 2018

लातूर ः केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. साखरचे भाव सहाशे रुपयांनी उतरूनदेखील सरकार हस्तक्षेप करायला तयार नाही. ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने पुढच्या वर्षी परिस्थिती आणखी बिघडणार आहे. साखर कारखाने चालू झाले नाही तर भरपाई देऊन सरकार बुडून जाईल, अशी भीती व्यक्त करून यात शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार अजित पवार यांनी केली.

लातूर ः केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. साखरचे भाव सहाशे रुपयांनी उतरूनदेखील सरकार हस्तक्षेप करायला तयार नाही. ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने पुढच्या वर्षी परिस्थिती आणखी बिघडणार आहे. साखर कारखाने चालू झाले नाही तर भरपाई देऊन सरकार बुडून जाईल, अशी भीती व्यक्त करून यात शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली हल्लाबोल यात्रा शुक्रवारी (ता. १९) लातूर जिल्ह्यात आली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, आमदार विक्रम काळे, आमदार विद्या चव्हाण, चित्रा वाघ, आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे आदी उपस्थित होते.

‘‘शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्यांकडे वळत आहेत. कर्जमाफी व्यवस्थितीत दिली गेली नाही, वीज जोडणी देण्याअगोदरच वीजबिले दिली जात आहेत. तेलंगणात मोफत चोवीस तास वीज दिली जाते, पण येथे माफक दरात आठ ताससुद्धा वीज मिळत नाही. ज्यांनी कर्ज फेडले त्यांना प्रोत्साहनाचे २५ हजार रुपये दिले जात नाहीत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, बेरोजगारी वाढत आहे, शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. राज्यात काय चाललेय, हेच कळत नाही. काही विचारले की, अभ्यास सुरू आहे, असे सांगितले जाते. सध्या हे शासन केवळ जाहिरातबाजीत मश्गूल आहे,’’ अशी टीका श्री. पवार यांनी केली. 

ते पुढे म्हणाले, की आमच्या शासनातदेखील साखरेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तातडीने क्विंटलला शंभर रुपये निर्यात अनुदान दिले होते. आता सहाशे रुपयांनी साखरेचे दर कमी झाले आहेत. त्याचा परिणाम साखर उद्योगावर होणार आहे. पण शासन हस्तक्षेप करायला तयार नाही. पुढच्या वर्षीतर वाढत्या ऊसामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे. कारखाने सुरूच होतात की नाही याची भीती आहे. अशा वेळी नुकसान भरपाई देऊन सरकार बुडून जाईल. त्यामुळे आता लक्ष देण्याची गरज आहे. 

‘‘मराठवाड्यात सतत दोन तीन वर्ष दुष्काळ होता. त्याची महावितरणकडून मोठ्या प्रमाणात बिले दिली जात आहेत. येथील शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ देण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप देऊन विजेवर मात करण्याची गरज आहे,’’ असेही श्री. पवार म्हणाले. 

एकंबी (ता. औसा) येथील शहाजी राठोड या शेतकऱ्याने जास्तीचे वीजबिल आल्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत. पाच, सहा लाख खर्च येणार आहे. पक्षाच्या वतीने त्यांना तातडीची एक लाखाची मदत करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी यावेळी दिली.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...