agriculture news in Marathi, Ajit pawar says this government for whom welfare, Maharashtra | Agrowon

सारेच त्रस्त, मग सरकार नेमके कोणाच्या हिताचे : अजित पवार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018

जाफराबाद, जि. जालना : भाजपप्रणीत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले. या सरकारच्या काळात सर्वच त्रस्त असल्यामुळे हे सरकार नेमके कोणाच्या हिताचे आहे, हेच कळेना. केवळ घोषणाबाज असलेल्या या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

जाफराबाद, जि. जालना : भाजपप्रणीत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले. या सरकारच्या काळात सर्वच त्रस्त असल्यामुळे हे सरकार नेमके कोणाच्या हिताचे आहे, हेच कळेना. केवळ घोषणाबाज असलेल्या या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित हल्लाबोल यात्रा बुधवारी (ता.२४.) जाफराबाद येथे पोचली. जाफराबादच्या तहसील कार्यालयाच्या मैदानात मोर्चानंतर झालेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. या वेळी माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, खासदार माजीद मेमन, जिल्हाध्यक्ष डाॅ. निसार देशमुख, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने, माजी खासदार पुंडलिक हरी दानवे, आमदार चंद्रकांत दानवे, राजेश चव्हाण, कदीर मौलाना, रामधन कळंबे यांची उपस्थिती होती. 

श्री. पवार म्हणाले, की केंद्र आणि राज्यात भाजप- शिवसेना आघाडीचे सरकार आहे. सर्वसामान्याच्या मुळावरच आलेले हे सरकार आहे. या सरकारने सर्वसामान्यांना रांगेत उभे करून वेठीस धरले. अशा सरकारला जनतेने आता त्याची जागा दाखवावी. माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले, की शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी हल्लाबोल यात्रा आहे. या वेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनीही आपले विचार व्यक्‍त केले. 

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण यांनी केले. खासदार माजीद मेनन यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शेख कौसर यांनी केले. 

 

इतर अॅग्रो विशेष
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....