agriculture news in marathi, Ajit pawar warns goverment on agri pump electricity bill issue | Agrowon

कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जानेवारी 2018

उस्मानाबाद : आम्ही कायदा हातात घेत नाही, तशी वेळ आणू नका, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा तोडला, तर सरकारला आणि ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला.

उस्मानाबाद : आम्ही कायदा हातात घेत नाही, तशी वेळ आणू नका, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा तोडला, तर सरकारला आणि ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप- शिवसेनेच्या फसव्या सरकारविरुद्ध मराठवाडा पातळीवर मंगळवारी (ता. १६) उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत श्री. पवार बोलत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, विक्रम काळे, राहुल मोटे, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, विद्या चव्हाण, चित्रा वाघ, नवाब मलिक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पवार म्हणाले, सहा महिने झाले तरी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडत आहे. शेतकऱ्यांकडे सध्या पैसा नाही. शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडल्यास सरकार व ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा श्री. पवार यांनी दिला. श्री. मुंडे म्हणाले, की सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादीची बांधिलकी सर्वसामान्यांशी आहे. 

तुळजाभवानीचे दर्शन घेऊन हल्लाबोल आंदोलनाला सुरवात
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा मंगळवारी (ता. १६) तुळजापुरातून सुरू झाला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या दरबारात सकाळी जागरण गोंधळ घालून साकडं घालत आंदोलनाची सुरवात करण्यात आली. त्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते तुळजापुरात दाखल झाले होते. या वेळी तहसीलवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. 
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...