agriculture news in Marathi, ajwain planting will be beneficial in vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भात ओवा ठरेल फायद्याचा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

विदर्भाच्या काही जिल्ह्यांत ओव्याला वातावरण पोषक आहे. उत्पादन खर्च कमी असल्याने या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याची गरज असून, त्याकरिता कृषी आयुक्‍तांना यापूर्वी प्रस्ताव दिला होता. आता पुन्हा असा प्रस्ताव दिला जाईल.
- डॉ. एस. सी. नागपूरे, कृषी अर्थशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

नागपूर ः विदर्भातील वातावरणात ओवा पीक फायद्याचा ठरेल. त्यामुळे हरभरा, गव्हासोबतच ओवा पिकाचादेखील मुख्य रब्बी पिकाच्या श्रेणीत समावेश करावा व ओवा लागवडीला कृषी विभागामार्फत प्रोत्साहन मिळावे, असा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी आयुक्‍तांना पाठविला आहे.

 विदर्भाच्या अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांतील वातावरण ओवा पिकाकरिता पोषक असल्याचा निष्कर्ष कृषी विद्यापीठाने अभ्यासाअंती मांडला आहे. कृषी अर्थशास्त्र विभागाचे डॉ. आर. जी. देशमुख, डॉ. एस. सी. नागपुरे, डॉ. श्याम घावडे यांनी हा अभ्यास केला. त्याअंतर्गत २०१० ते २०१३ या तीन वर्षे कालावधीतील या पिकाचा उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद तपासण्यात आला. १८ ते २२ हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळतो. २०१०-११ ला ११ हजार रुपये, २०१२-१३ या वर्षात ७५०० रुपये प्रतिक्‍विंटल तर २०१५-१६ या वर्षात २२ हजार रुपये प्रतिक्‍विंटल दर ओव्याला मिळाले. 

गुजरातमधील उंझा, जामनगर, मध्य प्रदेशातील निमच जावरा, पोहरी,  महाराष्ट्रातील शेगाव, नंदूरबार, लासूर स्टेशन, राजस्थानमधील भिलवाडा, आंध्र प्रदेशमधील कर्नुल येथे बाजारपेठ आहे. चार महिने कालावधीच्या या पिकाची उत्पादकता ८ ते ९ क्‍विंटल मिळते. हेक्‍टरी २३ हजार रुपयांचा खर्च होतो. २०११-१२ मध्ये १४१० हेक्‍टर ओवा लागवड होती. त्यानंतर आजच्या घडीला हे क्षेत्र तीन हजार हेक्‍टरपेक्षा अधिक झाल्याचे डॉ. राजेंद्र देशमुख यांनी सांगितले. 

हे पीक फायदेशीर असून उत्पादकतेवर १ रुपया खर्च केला तर २ रुपये ४२ पैसे मिळतात, असे निरीक्षण कृषी अर्थशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांनी आपल्या अभ्यासात नोंदविले आहे. रबी हंगामात गहू, हरभऱ्याच्या जोडीला या पिकालाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्याकरिता यापूर्वी कृषी आयुक्‍तांना प्रस्ताव देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा प्रस्ताव देऊन याकडे लक्ष वेधले जाणार आहे. 

येथे होते ओवा लागवड
अकोला ः
अकोला, अकोट
बुलडाणा ः शेगाव, मेहकर,
अमरावती ः दर्यापूर, अंजनगावसूर्जी
वाशीम ः वाशीम, मंगरुळपीर, काटा, जांभरुण महाले

 

इतर अॅग्रो विशेष
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...