agriculture news in marathi, Akola and Buldhada to save someone who will vote? | Agrowon

अकोला, बुलडाण्यात वाढीव मतदान कुणाला तारणार?
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

अकोला  : लोकशाहीचा उत्सव म्हणून गणना केलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १८) अपेक्षेपेक्षा अधिक मतदान झाले. अकोला लोकसभा मतदारसंघात ५९.९८ टक्के, तर बुलडाणा मतदारसंघात ६३.५४ टक्क्यांवर मतदान झाले. २०१४ च्या मतदानापेक्षा दोन्ही मतदारसंघांत सुमारे दीड ते दोन टक्के मतदान वाढले आहे. त्याचा नेमका कुणाला फायदा होणार, हे आता २३ मे रोजी येणाऱ्या निकालांमधूनच स्पष्ट होईल.

अकोला  : लोकशाहीचा उत्सव म्हणून गणना केलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १८) अपेक्षेपेक्षा अधिक मतदान झाले. अकोला लोकसभा मतदारसंघात ५९.९८ टक्के, तर बुलडाणा मतदारसंघात ६३.५४ टक्क्यांवर मतदान झाले. २०१४ च्या मतदानापेक्षा दोन्ही मतदारसंघांत सुमारे दीड ते दोन टक्के मतदान वाढले आहे. त्याचा नेमका कुणाला फायदा होणार, हे आता २३ मे रोजी येणाऱ्या निकालांमधूनच स्पष्ट होईल.

बुलडाणा मतदारसंघात ६३.५८ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. या जिल्ह्यात मलकापूर विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात असल्याने तेथे मतदान नव्हते. उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये मतदान झाले. यावेळी जिल्ह्यात तिरंगी लढत झाली. शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जोरदार लढत दिली. तसेच बहुजन वंचित आघाडीचे बळीराम सिरस्कार यांनीही जोरदार मुसंडी मारली. या तिघांमध्ये काट्याची लढत होऊ घातली आहे.

तरुण मतदारांचा टक्का नेमका कुणाच्या पारड्यात पडतो, यावर या तिघांपैकी एकाचा विजय ठरणार आहे. बहुसंख्य मतदारांचा कौल पाहता जाधव, शिंगणे यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०१४ मध्ये ६१.३१ टक्के मतदान झाले होते. 
अकोला मतदारसंघात २०१४ ला ५८.५० टक्के मतदान झाले होते. यावेळी ५९.९८ टक्के मतदान झाले. अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे यांना कॉंग्रेसचे हिदायत पटेल, बहुजन वंचित आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी किती टक्कर दिली, यावर विजयाचे गणित ठरेल.

या मतदारसंघात कॉंग्रेसपेक्षा बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार अधिक मते घेईल, असे राजकीय जाणकार गणिते मांडत आहेत. मतांचे विभाजन कसे व किती होते, यावर विजय ठरेल. तीनही उमेदवारांकडून विजयाची खात्री व्यक्त होत आहे. 
 

इतर बातम्या
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
शिकारीमुळे स्थानिक अन्नसुरक्षेवर होतोय...वर्षावनातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत...
नाशिकला डोंगराची काळी मैना विक्रीसाठी...नाशिक : आदिवासी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर...
सिन्नर तालुक्यातील छावण्यांमध्ये १०९४...नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात अधिग्रहित विहिरींना...उमरखेड, यवतमाळ ः पाणीटंचाई निवारण्यासाठी म्हणून...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
हिंगोली : टॅंकरद्वारे ५६ हजार...हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर...
अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शनअकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
चारा, पाण्याची व्यवस्था करा : आमदार...सांगोला, जि. सोलापूर  : राज्यात दुष्काळी...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
गाळ उपसण्यासाठी गावकऱ्यांचे ‘एकीचे बळ'संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी : ‘एकीचे बळ मिळते फळ’...
सोलापूर, माढ्याचा निकाल उशिरासोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...