agriculture news in Marathi, Akola cooperative bank first in country, Maharashtra | Agrowon

अकोला जिल्हा सहकारी बॅंक ठरली भारतात उत्कृष्ट
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

अकोला ः अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला भारतातील उत्कृष्ट जिल्हा सहकारी बॅंक म्हणून हैद्राबाद येथे झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात अाले. ही बँक ११० व्या वर्षांत पदार्पण करीत असताना हा सन्मान झाला अाहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘इनमा’ या आर्थिक सर्वेक्षण संस्थेने बॅंको राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. बॅंकेच्या सन्मानात या पुरस्कारामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.            

अकोला ः अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला भारतातील उत्कृष्ट जिल्हा सहकारी बॅंक म्हणून हैद्राबाद येथे झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात अाले. ही बँक ११० व्या वर्षांत पदार्पण करीत असताना हा सन्मान झाला अाहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘इनमा’ या आर्थिक सर्वेक्षण संस्थेने बॅंको राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. बॅंकेच्या सन्मानात या पुरस्कारामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.            
हैद्राबाद येथे झालेल्या कार्यक्रमात तेलंगाणा राज्याचे उपमुख्यमंत्री मो महेमुद अली, आयडीआरबीटीचे संचालक डॉ. ए. एस. रामाशास्त्री तसेच रमेश कुमार बंग यांच्याहस्ते ‘बॅंको पुरस्कार’देण्यात अाला. बँकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य, कर्जे व देखरेख विभागाचे व्यवस्थापक प्रभुदास शेंडे व हिशेब व बँकिंग विभागाचे व्यवस्थापक शिवप्रसाद मोहोड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

‘इनमा’ या राष्ट्रीय आर्थिक संस्थेने देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचा सर्वांगीण अभ्यास करून बॅंको पुरस्काराकरिता अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंकेची उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक म्हणून निवड केली.

सर्वांच्या सहकार्यामुळे यश : डॉ. कोरपे
या पुरस्काराबाबत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे म्हणाले, अकोला व वाशीम जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, ग्राहक, ठेवीदार, भागदारक व हितचिंतकांचा बॅंकेवरील दृढ विश्वासामुळेच सातत्याने प्रगती होत अाहे. बॅंकेवरील विश्वास हाच सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. जनतेच्या विश्वासावर बॅंक  सातत्त्याने प्रगतिपथावर राहील असा विश्वास अाहे.
 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...