अकोला जिल्हा बँकेचे आता मोबाईल बँकिंग क्षेत्रात पाऊल

मोबाईल बॅंकिंग
मोबाईल बॅंकिंग

अकोला ः अकोला व वाशीम जिल्ह्यांत शेतकऱ्यांसह ग्राहकांसाठी सक्रिय कार्यरत असलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काळाची पावले अोळखत मोबाईल बँकिंग क्षेत्रात पाऊल टाकले अाहे. ‘अकोला डीसीसी -एम पे’ नावाचे मोबाईल ॲप बँकेतर्फे सुरू केले जात असून येत्या रविवारी (ता.२९) याचा लोकार्पण सोहळा अायोजित करण्यात अाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी दिली.  या सोहळ्याची माहिती देण्यासाठी बँकेच्या मुख्यालयात नुकतीच पत्रकार परिषद झाली. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष वामनराव देशमुख, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य उपस्थित होते. या सोहळ्याला प्रसिद्ध वक्त्या श्रीमती शेरॉन प्रभाकर, ‘अाधार’चे संचालक सुमनेष जोशी, जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय, लक्ष्मीनारायण मिश्रा, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले उपस्थित राहतील. डॉ. संतोषकुमार कोरपे हे अध्यक्षस्थानी असतील.  अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक ११० वर्षांपासून अकोला व वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी असल्याचे सांगत डॉ. कोरपे म्हणाले, की बँकेने १०० टक्के पीक कर्जवाटप केसीसी कार्डद्वारे करून सहकारी बँकांमध्ये कार्डद्वारे कर्जवाटपाचा उच्चांक गाठला अाहे. ग्रामीण भागातील युवक अापल्या पायावर उभे राहले पाहिजे यासाठी विविध शेतीपूरक व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यावर्षी बँकेने अातापर्यंत ३७ हजार सभासद शेतकऱ्यांना २६४ कोटींचे पीक कर्जवाटप केले अाहे. बँक आता शेतीक्षेत्रासोबतच व्यावसायिक बनण्याचा प्रयत्न करीत अाहे. शेतकरी व ग्रामीण युवकांसह नोकरदार, व्यापारी, उद्योजक यांच्याकरीत विविध प्रकारच्या कर्ज योजना बँक राबवित अाहे. गेल्या काही वर्षांत ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी विविध उपाय योजण्यात येत अाहेत. अाता मोबाईल बँकिंकमुळे ग्राहकांना सातही दिवस अाणि २४ तास व्यवहार करण्याची मुभा मिळणार अाहे, असेही डाॅ. कोरपे म्हणाले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com