agriculture news in marathi, Akola district has only 31 percent crop loan | Agrowon

अकोला जिल्ह्यात केवळ ३१ टक्के पीक कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

अकोला : शेतकऱ्यांना खरीप हंगामात अधिकाधिक पीककर्ज देऊन अार्थिक पाठबळ देण्याच्या घोषणा राज्यकर्त्यांनी केल्या खऱ्या; मात्र तांत्रिक अडचणी आणि बँकांच्या नकारात्मक भूमिकेमुळे अकोला जिल्हयात १३३४ कोटींचे उद्दिष्ट अवघे ४११ कोटींवरच गुंडाळले गेले. एकूण कर्जाच्या केवळ ३१ टक्केच पीक कर्जवाटप झाले असून, जिल्ह्यात ६९ टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित राहले अाहेत. विशेष म्हणजे खरीप हंगामातील अाढावा बैठकांत पीक कर्जवाटपाची गती वाढवण्याची सूचना करण्यात अाली होती. कारवाईबाबत इशारेही देण्यात अाले होते.    

अकोला : शेतकऱ्यांना खरीप हंगामात अधिकाधिक पीककर्ज देऊन अार्थिक पाठबळ देण्याच्या घोषणा राज्यकर्त्यांनी केल्या खऱ्या; मात्र तांत्रिक अडचणी आणि बँकांच्या नकारात्मक भूमिकेमुळे अकोला जिल्हयात १३३४ कोटींचे उद्दिष्ट अवघे ४११ कोटींवरच गुंडाळले गेले. एकूण कर्जाच्या केवळ ३१ टक्केच पीक कर्जवाटप झाले असून, जिल्ह्यात ६९ टक्के शेतकरी पीककर्जापासून वंचित राहले अाहेत. विशेष म्हणजे खरीप हंगामातील अाढावा बैठकांत पीक कर्जवाटपाची गती वाढवण्याची सूचना करण्यात अाली होती. कारवाईबाबत इशारेही देण्यात अाले होते.    

खरीप हंगामासाठी एक एप्रिलपासून पीक कर्जवाटपाला सुरवात झाली. हंगाम संपेपर्यंत म्हणजेच २९ सप्टेंबरपर्यंत केवळ ३१ टक्के कर्जवाटप झाले. जिल्ह्यात असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. कर्जमाफीची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नसल्याने पीक कर्जवाटपात असंख्य तांत्रिक अडचणी अाल्या. त्याचा फटका वाटपाला बसल्याचे बँक व्यवस्थापनांकडून वारंवार सांगितले जात होते. हंगाम अाटोपला तरीही या अडचणी दूर झाल्या नाहीत.  
जिल्हा बॅंकेला ६५० कोटी रुपये वाटप करायचे होते. या बँकेने सप्टेंबरअखेर १८४ कोटींचे वितरण केले. ही सरासरी २८ टक्के एवढी अाहे. 

कर्जमाफीचे लाभार्थी पात्र असतानाही कागदपत्रांची पूर्तता करू शकत नसल्याने वंचित राहले. त्यांचे खातेही नील झालेले नाहीत. शिवाय नियमित खातेदारांनी चालू कर्ज न भरल्याने त्यांनाही पुन्हा कर्ज मिळण्यात अडचणी अालेल्या अाहेत. लवकरच रब्बी हंगाम सुरू होत अाहे. या हंगामासाठी बँकांकडून पीककर्ज मिळेल किंवा नाही, याची काहीच शाश्वती सध्या दिसत नाही.

इतर बातम्या
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
अकोला जिल्ह्यात दुष्काळस्थिती गंभीरअकोला : पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात कडधान्यांच्या आवकेत घटजळगाव : खानदेशात ज्वारीचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी...
खानदेशातील दुष्काळी स्थिती गंभीरजळगाव : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प...
पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘जलयुक्‍त`वर भर...यवतमाळ : जिल्ह्यात सरासरी समाधानकारक पाऊस झाला....
शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासारख्या...वर्धा : जिल्ह्यात लहान, मोठे मिळून १८० तलाव आहेत...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
नखातवाडी तलावातील पाणीसाठा जोत्याखालीपरभणी ः वाढते तापमान, जोराचे वारे, उपसा यामुळे...
रासायनिक खते, कीटकनाशके वापराविषयी...परभणी ः रासायनिक खते, कीटकनाशकांच्या असंतुलित...
सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी :...जाफराबाद, जि. जालना  : तालुक्‍यातील पीक...
पालखेडच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमकयेवला, जि. नाशिक : येवला तालुका सतत दुष्काळी...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
हरभरा लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनऔरंगाबाद : कृषी विज्ञान मंडळाच्या...
सांगली जिल्ह्यात रब्बीची पेरणी संकटातसांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुरेसा झाला...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...