agriculture news in marathi, Akola district will get the benefits of pavement money | Agrowon

अकोला जिल्ह्यात पीकविम्याचे पैसे मिळणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 ऑगस्ट 2018

अकोला : ‘‘पीकविम्याचे पैसे न मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील. शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. ज्या मंडळामध्ये पीकविमा लागू झालेला आहे, ज्या शेतकऱ्यांकडे पीक विम्याची पावती आहे, त्यांना येत्या काही दिवसांत हे पैसे मिळतील``, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली आहे.

अकोला : ‘‘पीकविम्याचे पैसे न मिळालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील. शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. ज्या मंडळामध्ये पीकविमा लागू झालेला आहे, ज्या शेतकऱ्यांकडे पीक विम्याची पावती आहे, त्यांना येत्या काही दिवसांत हे पैसे मिळतील``, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना, फळपीक विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलबजावणी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, नॅशनल इन्श्‍युरन्स कंपनीचे श्याम चिवरकर आदींसह अन्य विमा कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, बँक अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा झाले. पीक विमा रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाली. बोंड अळीची नुकसान भरपाई मिळावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळावी,  अशा मागण्या बैठकीत शेतकऱ्यांनी केल्या.
पीकविमा जमा होण्यात झालेल्या गोंधळाची गंभीर दखल पांण्डेय यांनी घेऊन जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेला संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश दिले. पैसे जमा न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा बॅंकेला दिला.

ज्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ भेटला नाही, त्यांची यादी येत्या तीन आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. या यादीत नाव नसलेल्या विमाधारक शेतकऱ्यांना तातडीने कार्यवाई करून लाभ मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  मार्च-२०१७ पूर्वी ज्या शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा झाले आहेत, याबाबत योग्य त्या कार्यवाहीसाठी राज्यस्तरीय बँक समितीकडे प्रस्ताव पाठविण्याबाबतची सूचनाही करण्यात आली.

पीक विमा भरपाईच्या दोन याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यापैकी पहिली यादी सहा जून रोजी प्रसिद्ध झाली. सुमारे ६३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दुसरी यादी १६ जुलै रोजी प्रसिद्ध झाली असून, या द्वारे सुमारे ३९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तिसरी यादी येत्या तीन आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. त्याद्वारे उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळतील, अशी माहिती विमा कंपनीचे चिवरकर यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...