agriculture news in marathi, akola farmers faces crop loan issues in district | Agrowon

पीककर्ज वाटपात गोंधळच
गोपाल हागे
सोमवार, 18 जून 2018

अकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण वाटणार नाही, मात्र त्याला एखाद्या कामासाठी लागणारा कागद अधिकाऱ्याकडून काढायचा असेल तर ते काम सर्वाधिक तापदायक वाटत असते. सध्या खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटप सुरू अाहे. पीककर्ज काढण्यासाठी अर्ज, अर्जासोबत जोडायची कागदपत्रे या सर्वांबाबत संभ्रम तयार झालेला अाहे. 

अकोला : शेतकऱ्याला शेतातील कुठलेही काम करणे कठीण वाटणार नाही, मात्र त्याला एखाद्या कामासाठी लागणारा कागद अधिकाऱ्याकडून काढायचा असेल तर ते काम सर्वाधिक तापदायक वाटत असते. सध्या खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटप सुरू अाहे. पीककर्ज काढण्यासाठी अर्ज, अर्जासोबत जोडायची कागदपत्रे या सर्वांबाबत संभ्रम तयार झालेला अाहे. 

      अालेगाव (ता. पातूर) येथील एका बँक शाखेत फारशी गर्दी नव्हती. दैनंदिन व्यवहार, निराधार खात्यातील पैसे काढणारे ये-जा करीत होते. एखाद-दुसरा शेतकरी येत होता. कुणी पीककर्जाची फाइल घेऊन तर कुणी पिकविमा अाला का हे विचारत होता... दशरथ शेळके नावाचे शेतकरी याच ठिकाणी भेटले. घरी दहा एकर शेती. त्यातील एका एकरात सिंचन होईल इतकेच पाणी सध्या त्यांच्याकडे अाहे. त्यांनी २०१६-१७ मध्ये पीककर्ज घेतले होते. पण ते माफ झाले किंवा नाही याची अद्याप काहीच माहिती त्यांना मिळालेली नाही. 

अालेगावपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर त्यांचे गाव अाहे. येथून सकाळीच ते अाले होते. गेली दोनवर्षे सोयाबीन, हरभरा पिकला; मात्र भाव नसल्याने पीक परवडले नाही. अाता यावर्षी पेरायचे, तर पैसा नाही. बँकेत तिसऱ्यांदा अालो असल्याचे ते म्हणाले. कर्जमाफीबाबत माहिती मिळाली, तर नवीन पीककर्जासाठी कागदपत्रे जमवू असे ते म्हणाले. शेळकेंप्रमाणे बरेच शेतकरी बँकेत येत होते व चौकशी करून जात होते. प्रत्येकाला कागदपत्रांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ अालेले अाहेत, हे स्पष्ट जाणवत होते.

वाडेगाव येथे लाहोकार नावाचा तरुण शेतकरी भेटला. पहिल्यांदाच पीककर्ज घेत होता. अामचे एकत्र कुटुंब असून काही जमीन अाईच्या व काही माझ्या नावे अाहे. अाता पीककर्ज घ्यायला अालो तर बँकांनी १३ प्रकारचे कागदपत्रे मागितली. यासाठी एक कागद पातूर, एक बाळापूर अाणि एक अकोल्यातून अाणावा लागला. एवढे करूनही एकाच कुटुंबाची जमीन असताना अाईकडून ना हरकत प्रमाणपत्र बाँडवर बँकेला लिहून हवे अाहे. गेले १५ दिवस या कागदपत्रांसाठी अधिकारी, बँक शाखांकडे चकरा मारल्या. तरीही पीककर्जाचे प्रकरण फायनल झाले नाही. 

शेतकरी असल्याचे पत्र दिले तर चार्ज टळू शकतो
सध्या शेतकऱ्यांना विविध कागदपत्रे जमावी लागतात. त्यात नो ड्युज हे सर्वांत महत्त्वाचे असते. प्रत्येक बँक हे प्रमाणपत्र देण्यासाठी काही चार्ज अाकारते. यासाठी जवळपास ८०० ते १००० रुपयांचा खर्च शेतकऱ्याला लागत अाहे. याबाबत संबंधित व्यक्ती शेतकरी अाहे असे पत्र सोसायटीने लिहून दिले तर हा चार्ज बँका टाळू शकतात, असे बँक व्यवस्थापकाचे म्हणणे होते. पीककर्ज वाटपाची गती संथ कशामुळे अाहे हे विचारले असता, शेतकऱ्यांकडून परिपूर्ण कागदपत्रांची फाइल अाली तर पीककर्ज द्यायला काहीही विलंब होत नाही, असे व्यवस्थापक सांगत अापली बाजू सावरत होते.

बँकेच्या अाले मना...!
पातूर तालुक्यातील सस्ती या गावात स्टेट बँकेत काही खातेदार, शेतकरी बसलेले होते. दुपारची वेळ असल्याने बँकेचे गेट मात्र बंद झालेले होते. कार्यालयीन वेळ संपलेली नसताना व बुधवारी कुठलीही सुटी जाहीर झालेली नसताना या बँक शाखेने व्यवहार बंद ठेवलेले होते, जबाबदार कुणीही बोलत नव्हता. थोड्याच वेळात तेथून वाडेगाव गाठले. कार्यालयीन कामकाजाची वेळ संपायला अद्याप दोन ते अडीच तास शिल्लक होते. मात्र, याही गावात स्टेटबँकेच्या शाखेत भेट दिली, तर बँक बंद असल्याचा फलक गेटजवळच झळकलेला दिसून अाला. येथेही शेतकरी व खातेदार येत अाणि बँक बंद असल्याचे पाहून निघून जात. मुळात पीककर्ज वाटपाचा मोसम असताना बँक मात्र कुठल्याही ठोस कारणाशिवाय अापल्याच पद्धतीने कामकाज करीत असल्याचे याठिकाणी शेतकरी सर्रास बोलत होते. ‘बँकेच्या अाले मना, तेथे कुणाचे चालेना ! असा हा प्रकार होता.
 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...