agriculture news in marathi, Akola farmers strike has a break after Chief ministers assurance | Agrowon

अकोल्यातील शेतकरी अांदोलन मागे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

अकोला : प्रशासनाकडून गेल्या दोन दिवसांपासून ठोस तोडगा न निघाल्याने सुरू असलेले शेतकरी अांदोलन अखेर मुख्यमंत्र्यांच्या ‘शब्दा’मुळे मागे घेण्यात अाले. अांदोलकांच्या सर्वच मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी शासनाकडून मागण्यांबाबत मिळालेल्या अाश्वासनाची माहिती दिली.

अकोला : प्रशासनाकडून गेल्या दोन दिवसांपासून ठोस तोडगा न निघाल्याने सुरू असलेले शेतकरी अांदोलन अखेर मुख्यमंत्र्यांच्या ‘शब्दा’मुळे मागे घेण्यात अाले. अांदोलकांच्या सर्वच मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी शासनाकडून मागण्यांबाबत मिळालेल्या अाश्वासनाची माहिती दिली. या वेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश द्विवेदी, शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, राष्ट्रवादी किसान सेलचे शंकरअण्णा धोंडगे, अापच्या नेत्या कीर्ती मेनन, जागर मंचाचे प्रशांत गावंडे, मनोज तायडे यांच्यासह इतर उपस्थित होते. 

शेतीमालाची हमीभावाने खरेदी, वीजजोडणी, सावकारी कर्जमुक्ती, कर्जमाफी अादी मुद्यांवर अकोल्यात गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी अांदोलन पेटले होते. यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जागरमंचाचे पदाधिकारी, शेतकरी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर तळ ठोकून बसले होते. 

सुरवातीचे दोन दिवस झालेल्या चर्चांमधून कुठलाही तोडगा निघाला नव्हता. मात्र बुधवारी दुपारपासून जोरदार हालचाली झाल्या. साडेतीन वाजेपासून यशवंत सिन्हा, खासदार दिनेश द्विवेदी, रविकांत तुपकर यांच्यासह मोजक्या काहींसोबत जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांची बंदद्वार चर्चा झाली. शिवाय यशवंत सिन्हा व मुख्यमंत्र्यांमध्ये थेट चर्चा झाली. त्यानंतर ही सायंकाळी सहाच्या सुमारास सिन्हा यांनी अौपचारिक घोषणा केली.

शासनाच्या मागण्यांबाबत अाश्वासन दिल्याने यापुढे एकही शेतकरी अात्महत्या करणार नाही, याचे अाश्वासन घेतले. गेल्या दोन दिवसांत अधिकारी व अांदोलकांमध्ये चर्चा झाल्या. यात कर्जमुक्तीचा विषय शासन स्तरावर प्रलंबित असल्याने त्यावर चर्चा झाली नाही. भावांतराच्या मुद्यावर शासनाकडून काहीही सांगितले जात नाही. शेतकऱ्यांची वीजजोडणी न तोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अादेश देण्याचे मान्य केले. परंतु सोने तारण योजनेतील जाचक अटी काढण्यास सरकारकडून तयारी दाखवली जात नव्हती. आंदोलन मागे घेतले घेण्याच्या अटीवर प्रशासनाकडून दबाव टाकल्या जात होता. परंतु यशवंत सिन्हांसह शेतकरी जागर मंचाचे शिष्टमंडळ एेकायला तयार नव्हते. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही. मात्र बुधवारी दुपारी घटनाक्रम होऊन अांदोलन सुटण्याची शक्यता तयार झाली.

मुख्यमंत्र्यांनी सर्वच मागण्यांबाबत होकार दर्शविला. त्यामुळे अांदोलन मागे घेत असल्याचे सिन्हा यांनी जाहीर केले. मात्र हे अांदोलन संपले नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देशभर अावाज उठला. ही सुरवात झाली अाहे असेही सांगितले. तत्पूर्वी खासदार त्रिवेदी, खासदार जाधव, रविकांत तुपकर, शंकरअण्णा धोंडगे यांनी मार्गदर्शन केले.

 

इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...