अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३०० रुपये

अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३०० रुपये
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३०० रुपये

अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी जोमाने सुरू असून, बाजारपेठांमधील अावकेतही दर दिवसाला वाढ होत अाहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १९) ११०० क्विंटल मूग विक्रीला अाला होता. मुगाचा कमीत कमी ३८०० व जास्तीत जास्त ५३०० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सरासरी ४५०० रुपये दर मिळाला.

गेल्या १५ दिवसांपासून मुगाची अावक सातत्याने सुधारत अाहे. सध्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, तसेच काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा अाल्याने शेतकऱ्यांची लगबग झाली. त्यामुळे तातडीने मूग काढणी करून अनेकांना बाजारात मिळणाऱ्या दरात मूगाची विक्री चालविली. दररोज अावक वधारत अाहे. अकोला बाजार समितीत मुगापाठोपाठ उडदाची अावक वाढत अाहे. बुधवारी ५८२ क्विंटल उडीद अाला होता. ३४०० ते ४१०० दरम्यान उडदाला भाव भेटला.

सरसरी ३७०० रुपये दर होता. सोयाबीनची २६४ पोते अावक होती. सोयाबीन ३१७५ ते ३२५० रुपये विक्री झाली. तुरीचा दर ४३५० ते ३७५० मिळाला. ४१८ क्विंटल अावक झाली होती. हरभऱ्याचीही ३५७ क्विंटल अावक झाली होती. ३२२५ ते ३८५० दराने त्याची विक्री झाली. येत्या अाठवड्यात मूग, उडदाची अावक अाणखी वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

वाशीममध्येही मुगाच्या अावकेत सुधारणा वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १९) ६०० पोती मुगाची अावक झाली होती. तेथे मुगाला ४२०० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. या बाजारपेठेत सोयाबीनची अावकही १८०० पोती झाली. सोयाबीन ३००० ते ३३३५ रुपयांनी विकले गेले. सर्वाधिक अावक दोन हजार पोती उडदाची झाली होती. उडदाला ३२०० ते ३७०० दरम्यान भाव मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com