नगर : अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११०० रुपये

अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११०० रुपये
अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११०० रुपये

नगर ः जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले पारनेर बाजार समित्यांमध्ये कांद्याचे रविवारी लिलाव झाले. यामध्ये सर्वाधिक भाव अकोले बाजार समितीत ११०० रुपये मिळाला. त्या खालोखाल पारनेर बाजार समितीत पहिल्या क्रमांकाच्या कांद्याला एक हजार रुपये भाव मिळाला. 

जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले, पारनेर बाजार समित्यांत कांद्याचे लिलाव झाले. या चारही ठिकाणी कांद्याची एकूण ४७ हजार ८८९ गोण्या आवक झाली. यामध्ये राहात्यात पाच हजार २६२, राहुरीमध्ये १२ हजार २७५, अकोल्यामध्ये दोन हजार ६५७, पारनेरमध्ये २७ हजार ६९५ कांदा गोण्यांची आवक झाली. चारही बाजार समित्यांमध्ये पारनेर बाजार समितीत सर्वाधिक कांदागोण्यांची आवक झाली असून, त्याखालोखाल आवक राहुरीमध्ये झाली. तसेच पारनेर बाजार समितीत कांद्याला शुक्रवारी ९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः अकोले ः क्रमांक एक ः ७०० ते ११००, दोन ः ५०१ ते ७०१, तीन ः ३५० ते ५००, गोल्टी कांदा ः ४०० ते ६००, खाद ः १५१ ते २००. पारनेर ः क्रमांक एक ः ७०० ते एक हजार, दोन ः ५०० ते ७००, तीन ः २०० ते ४००, जोड कांदा ः १०० ते २००, गोल्टी कांदा ः २०० ते ४००. राहाता ः क्रमांक एक ः ७०० ते ९५०, दोन ः ३५० ते ६५०, तीन ः १०० ते ३००, गोल्टी कांदा ः ५०० ते ६००, जोड कांदा ः १५० ते ३५०. राहुरी ः क्रमांक एक ः ७७५ ते ८५०, दोन ः ५०० ते ७७०, तीन ः १०० ते ४९५, गोल्टी कांदा ः २०० ते ७००. 

राहुरी बाजार समितीत कांद्याला शुक्रवारी मिळालेले दर पुढीलप्रमाणे ः एक नंबर ः ६२० ते ७५०, दोन ः ४७५ ते ६१५, तीन ः १०० ते ४७०, गोल्टी कांदा ः २०० ते ६५०. राहाता ः एक नंबर ः ५५० ते ७५०, दोन ः ३०० ते ५००, तीन ः १०० ते २५०, गोल्टी कांदा ः ४०० ते ५००, जोड कांदा ः १०० ते २००. घोडेगाव ः एक नंबर ः ६०० ते ७५०, दोन ः ४०० ते ५५०, तीन ः १०० ते ४००, जोड कांदा ः १०० ते २००, गोल्टी कांदा ः ४०० ते ५५०. पारनेर ः ६०० ते ९००, दोन ः ४०० ते ६००, तीन ः २०० ते ४००, जोड ः १०० ते २००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com