अकोल्यात सोयाबीन, हरभरा, तुरीच्या अावकेत वाढ

अकोल्यात सोयाबीन, हरभरा, तुरीच्या अावकेत वाढ
अकोल्यात सोयाबीन, हरभरा, तुरीच्या अावकेत वाढ

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात सोयाबीन, हरभरा व तुरीची अावक वाढती रािहली. दरसुद्धा काहीसे टिकून होते. या सप्ताहात दोन दिवस सोयाबीनचा दर जास्तीत जास्त ३८०० पर्यंत पोचलेला बघायला मिळाला. तर हरभरा सरासरी ४२०० रुपये दराने विक्री झाला. तुरीचा सरासरी दर पाच हजारपर्यंत होता.

सोयाबीनची अावक अकोला तालुक्यासह इतर भागात होत असते. आवक मागील काही दिवसांपासून सोयाबीनची अावक वाढत अाहे. दरातही थोडीफार सुधारणा झालेली बघायला मिळाली. मागील आठवड्यात सोयाबीनची प्रतिदिन २५०० क्विंटलपेक्षा अधिक अावक झाली. दर कमीत ३२०० पासून, जास्तीत जास्त ३८०० पर्यंत मिळाले. सोयाबीनची मागणी वाढली असून, दरही चांगले मिळू लागले अाहेत. 

हरभऱ्याचा तसेच तुरीचा हंगाम सुरू झाल्याने अकोला तालुक्यासह परिसरातून अावक वाढू लागली. हरभऱ्याची आवक प्रतिदिन सरासरी ७०० क्विंटलपेक्षा अधिक झाली. प्रतिक्विंटल ३९०० ते ४१०० रुपये आणि सरासरी ४१०० रुपये दर मिळाला. तुरीची अावक सरासरी १२०० ते १५०० क्विंटलपर्यंत झाली होती. तुरीचा दर ४४०० ते ५३०० दरम्यान मिळाले.  

मूग, उडदाची अावक स्थिर किंवा कमी झाल्याचे दिसून येते. मुगाची प्रतिदिन सरासरी १०० क्विंटलपेक्षा अावक कमी होती. प्रतिक्विंटल ४३०० ते ५८०० पर्यंत दर मिळाले. तर उडदाची प्रतिदिन अशीच ४० ते ८० क्विंटलपर्यंत आवक होती. उडदाला ४००० ते ४९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. तिळाची दोनच दिवस आवक झाली. पाच क्विंटल तीळ विक्रीला अाला होता. १०७०० रुपये दर मिळाले. ज्वारीचा दर १४५० ते १९०० दरम्यान भेटला. अावक सरासरी ३० क्विंटलपेक्षा अधिक होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com