अकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर

अकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर
अकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर

अकोला ः येथील बाजार समितीत तुरीच्या अावकेत वाढ झाली अाहे. मंगळवारी (ता. २९) तुरीला कमीत कमी ४४०० व कमाल ५४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. 

सरासरी पाच हजार रुपये क्विंटलचा भाव होता. तुरीची २०६० क्विंटल अावक झाली होती. तुरीचा हंगाम जोरात असून, अावक दिवसेंदिवस वाढू लागली अाहे. बाजारात सोयाबीनचा दर ३४०० ते ३८०० असा होता. सोयाबीनची २९९७ क्विंटल अावक झाली. मुगाला कमीत कमी ४३०० व जास्तीत जास्त ५८११ रुपये दर होता. सरासरी ५५०० रुपये भाव भेटला. 

मुगाची १७८ क्विंटल आवक झाली. उडीद कमीत कमी ४००० ते जास्तीत जास्त ४८०० रुपये क्विंटल विक्री झाला. सरासरी ४७०० रुपये दर होता. ७६ क्विंटल उडदाची अावक झाली होती. हरभऱ्याची आवक हजार क्विंटलपेक्षा अधिक झाली होती. हरभऱ्याचा दर ४००० ते ४६२५ होता. सरासरी ४२०० रुपये दर भेटला. ११०४ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता.

वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीचे दर 
वाण दर (रुपयांत)  आवक (क्विंटलमध्ये) 
सोयाबीन ३७२० ते ३८०० ९७६७     
हरभरा ४००० ते ४२०० २१७
तूर ५००० ते ५३११ १६७३
उडीद ४००० ते ४२०० ५८
मूग ५००० ते ५५००
गहू १८५० ते २१०० २५६
ज्वारी १३५० ते १६७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com