अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ४४०० ते ५५५० रुपये

अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ४४०० ते ५५५० रुपये
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ४४०० ते ५५५० रुपये

अकोला ः अकोल्यात मुगाची बुधवारी (ता. २६) ९४६ क्विंटल अावक झाली होती. मुगाला कमीत कमी ४४०० व जास्तीत जास्त ५५५० रुपये दर मिळाला. सरासरी ५००० रुपये दर होता. मूग, उडदाचा हंगाम जोरावर अालेला असून, बाजारपेठांमध्ये अावकही वाढत अाहे. हमीभाव खरेदी केंद्र उघडण्याची काही शेतकरी प्रतीक्षा करीत असले, तरी बऱ्याच जणांनी रब्बीसाठी पैशांची तजवीज करण्यासाठी काढलेला मूग, उडीद बाजारात अाणला अाहे. यामुळेच येथील बाजार समितीत दोन्ही शेतीमालाची अावक सातत्याने वाढत अाहे.

मुगापाठोपाठ उडदाची अावकही या अाठवड्यात वाढून बुधवारी ८१६ क्विंटलपर्यंत पोचली. उडदाची विक्री ३३०० ते ४००० दरम्यान झाली. सरासरी ३८०० रुपये भाव भेटला. या दोन्ही वाणांशिवाय तूर, हरभरा यांची अावकही सुधारल्याचे दिसून अाले. हरभरा ६५७ क्विंटल विक्रीला अाला होता. हरभऱ्याला ३३०० ते ३९२५ रुपये दर भेटला. तुरीची अावकसुद्धा पाचशे क्विंटलपेक्षा अधिक झाली होती. तुरीची विक्री ३४५० ते ३८०० दरम्यान झाली. ६१५ क्विंटल तूर विक्रीला अाली होती.

सध्या सोयाबीनची आवक कमी झालेली अाहे. नवीन सोयाबीन पुढील अाठवड्यापासून विक्रीला येऊ शकते. बुधवारी २३० क्विंटल सोयाबीन अाले होते. ३०५० ते ३३११ या दरम्यान सोयाबीनची विक्री झाली. ज्वारीचा दर ११७० ते १३२५ दरम्यान होता. आवक केवळ १४ क्विंटल होती.   

वाशीममध्ये सोयाबीनची अावक वाढली वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची अावक सध्या वाढलेली अाहे. या ठिकाणी बुधवारी १६४३ क्विंटल सोयाबीन विक्रीला अाले होते. लवकरच नवीन हंगामातील सोयाबीन विक्रीला येणार अाहे. यामुळे अावकेत मोठ्या वाढीची शक्यता अाहे.     

वाण भाव अावक
सोयाबीन ३२१४-३५०० १६४३
हरभरा ३५०५-३८०० ५३३
तूर ३३००-३६०० ३५
उडीद ३४७५-३८५१ ८२८
मूग ४०००-५००० १५१
गहू १६५०-२००० २४५
ज्वारी ९५०-११५० ११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com