agriculture news in marathi, in Akot taluka Impact on banana crop | Agrowon

अकोट तालुक्यात केळी पिकावर करप्याचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जानेवारी 2018

अकोला : जिल्ह्यातील केळी निर्यात होऊ लागल्याने एकीकडे केळी उत्पादनाकडे शेतकरी वळत असतानाच वातावरणातील बदलाचा फटका सहन करावा लागत अाहे. जिल्ह्यात अकोट तालुक्यात केळीवर करप्याचे प्रमाण सध्याच्या वातावरणामुळे वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे.   

अकोला : जिल्ह्यातील केळी निर्यात होऊ लागल्याने एकीकडे केळी उत्पादनाकडे शेतकरी वळत असतानाच वातावरणातील बदलाचा फटका सहन करावा लागत अाहे. जिल्ह्यात अकोट तालुक्यात केळीवर करप्याचे प्रमाण सध्याच्या वातावरणामुळे वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे.   

अकोट, तेल्हारा तालुक्यात केळीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले अाहे. थंडीचा वाढलेला जोर, पानांवर साचणाऱ्या दवबिंदूमुळे करप्याचे प्रमाण वाढले अाहे. अकोट तालुक्यातील बहुतांश भागात सिंचनाची व्यवस्था असल्याने नगदी पैसे देणारे पीक म्हणून शेतकरी केळी पिकाकडे वळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणाचा परिणाम या पिकाला सहन करावा लागत आहे. जास्त प्रमाणात थंडी आणि रात्री पडणारा दव यामुळे येथील केळीबागा करपा बाधित झाल्याने केळी उत्पादकांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

करप्यामुळे केळीची पाने पिवळी पडून नंतर वाळत अाहेत. याचा परिणाम केळीचे घड निसवण्यावर होतो. घड लहान पडणे, फणीमध्ये केळांची संख्या कमी राहणे असे परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...
कोकणवर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी...नाणार  : नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार...
रणरणत्या उन्हातील धान्य महोत्सवाकडे...नागपूर  ः विदर्भाचा उन्हाळा राज्यात सर्वदूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाख टन खते उपलब्ध...पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली...
अकोला जिल्ह्यात १०३२ शेततळ्यांची कामे... अकोला ः पीकउत्पादन वाढीसाठी शाश्वत पाणीस्रोत...
मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या... औरंगाबाद  : गत आठवड्याच्या तुलनेत...
परभणीत‘शेतमाल तारण योजने अंतर्गत ४०... परभणी  ः परभणी कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा नगर ः जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या...
परभणीत खरिपात सोयाबीन, मूग, तुरीचे... परभणी  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगरमधील २ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना... नगर ः राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर...
नाशिक विभागातील ११०० गावांची "जलयुक्त... नाशिक : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी...
सार कसं सामसूम तरंग नाही तलावात...शेती कोरडवाहू. तरीही स्वबळावर दुग्ध व्यवसायातून...
बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ‘पॉक्‍सो’ कायद्यात...
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...