agriculture news in marathi, Akrosh Mundan Morcha on assemly today | Agrowon

महसूल कर्मचाऱ्यांचा आज आक्रोश मुंडण मोर्चा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 डिसेंबर 2017

चंद्रपूर : न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य महसूूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. 18) नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चाच्या माध्यमातून धडक दिली जाणार आहे. त्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी सामूहिक रजा घेतली असून, बल्लारपूर उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना निवेदन सादर करून मुख्यालय सोडण्याची परवानगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागितली.

चंद्रपूर : न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य महसूूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. 18) नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चाच्या माध्यमातून धडक दिली जाणार आहे. त्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी सामूहिक रजा घेतली असून, बल्लारपूर उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना निवेदन सादर करून मुख्यालय सोडण्याची परवानगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागितली.

राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेण्यात येईल. जुनी पेन्शन योजना सुरू ठेवावी, नवी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेत आक्रोश बळावला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दहा टक्‍के रक्‍कम कपात करून खासगी कंपन्यांना देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्या माध्यातून पेन्शन दिले जाणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांची कोणतीही रक्‍कम जमा होत नाही. त्याचा लेखाजोखाही शासनाजवळ नाही. यामुळे भविष्यात निवृत्तिवेतन मिळेल याची शाश्‍वती नसल्याचे महसूल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. शासन सेवेत 30 ते 35 वर्षे सेवा करून यामुळे पदरात काहीच पडणार नाही, अशी संभ्रमवस्था कर्मचाऱ्यांमध्ये आहे. याचा जाब सरकारला विचारण्यासाठी सोमवारी महसूल कर्मचारी महाआक्रोश मुंडण मोर्चा काढणार आहेत.

बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना याविषयी निवेदन देत मुख्यालय सोडण्याची परवानगी मागण्यात आली. या वेळी राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जी. डी. उपरे, पी. बी. नारनवरे, पौर्णिमा नेताम, प्रियंका खाडे, शोभा मुंडरे, अजय मेकलवार यांच्यासह पदाधिकारी होते.

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...