agriculture news in marathi, Akshta Program in Siddheshwar Yatra | Agrowon

सिद्धेश्‍वर यात्रेतील अक्षता सोहळ्याने दिपले डोळे
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जानेवारी 2018

सोलापूर ः ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी (ता. १३) दुपारी सव्वातीनच्या सुमारास मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर यात्रेतील मुख्य सोहळा असणारा नंदीध्वजाचा अक्षता सोहळा अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडला.

‘सत्यम...सत्यम..’चा जयघोष होताच अक्षता टाकण्यासाठी उंचावलेले हात आणि त्याचवेळी औटगोळ्यांची आतषबाजी, तुतारी- नगाऱ्यांच्या निनादामुळे वातावरण आणखीनच भारून गेले. अतिशय देखणा असा हा मंगलसोहळा पाहून साऱ्यांचेच डोळे क्षणभर दिपले.

सोलापूर ः ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी (ता. १३) दुपारी सव्वातीनच्या सुमारास मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर यात्रेतील मुख्य सोहळा असणारा नंदीध्वजाचा अक्षता सोहळा अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडला.

‘सत्यम...सत्यम..’चा जयघोष होताच अक्षता टाकण्यासाठी उंचावलेले हात आणि त्याचवेळी औटगोळ्यांची आतषबाजी, तुतारी- नगाऱ्यांच्या निनादामुळे वातावरण आणखीनच भारून गेले. अतिशय देखणा असा हा मंगलसोहळा पाहून साऱ्यांचेच डोळे क्षणभर दिपले.

श्री सिद्धेश्‍वर यात्रेतील अक्षतेचा हा सोहळा यात्रेतील मुख्य सोहळा मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. बाळीवेशीतील हिरेहब्बू यांच्या निवासस्थानी मानाच्या पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि राजशेखर देशमुख यांनी सकाळी सातच्या सुमारास नंदीध्वजांची विधिवत पूजा केली. त्यानंतर अन्य दोन नंदीध्वजांचीही पूजा करण्यात आली.

त्यानंतर अक्षता सोहळ्यासाठी मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीने मार्गस्थ झाले. मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या पालखी आणि नंदीध्वजाच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मिरवणुकीने सातही नंदीध्वज दुपारी पावणेतीनच्या सुमारास मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ आले. त्यानंतर सव्वातीनच्या सुमारास अक्षता सोहळ्याच्या मुख्य विधीस प्रारंभ झाला.

तत्पूर्वी सुगडी आणि गंगापूजनाचा कार्यक्रम झाला. या पूजेचा मान उत्तर कसब्यातील कुंभार यांना आहे. संमती वाचनासाठी मानकरी हिरेहब्बू आणि देशमुख यांनी शेटे यांना पुस्तक सुपूर्द केले. त्यानंतर कन्नड भाषेत त्यांनी पाच वेळा संमती वाचन केले. प्रत्येक कडव्याच्या शेवटी ‘सत्यम....सत्यम....’ असे उच्चारताच अक्षतांसाठी हजारो भाविकांचे हात उंचावले. एकाच वेळी हजारो हातांनी पडणाऱ्या अक्षतांचा हा सोहळा जणू डोळे दिपवणारा ठरला. त्याचवेळी औट गोळ्याची आतषबाजी आणि तुतारी- नगाऱ्यांचा निनादामुळे वातावरण उत्साहाने भारून गेले.

आज होमविधी, भाकणूक
सिद्धेश्‍वर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी उद्या (रविवारी) मकरसंक्रांतीला होम मैदानावर रात्री नऊच्या सुमारास होमविधी होणार आहे. त्या अगोदर सायंकाळी सातच्या सुमारास जुनी फौजदार चावडीजवळ पहिल्या नंदीध्वजाला नागफणा बांधण्यात येणार आहे. त्यानंतर हा नंदीध्वज होम मैदानापर्यंत नेण्यात येईल. त्यानंतर तिथे होमविधी होईल. शेवटी रात्री बाराच्या सुमारास भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे.

इतर बातम्या
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय...कॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो....
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
साताऱ्यात मेथी, कोथिंबिरीला प्रतिशेकडा...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी...सोलापूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाईवर मात...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
मराठवाड्यातील लघू, मध्यम प्रकल्पांतील...औरंगाबाद  : दुष्काळाच्या उंबरठ्यावरील...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
शास्वत उत्पन्नासाठी रेशीम उद्योग समजून...औरंगाबाद : शाश्वत उत्पादन व उत्पन्नासाठी नव्याने...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...