agriculture news in Marathi, All costs will take in to account for MSP, Maharashtra | Agrowon

हमीभाव ठरविताना सर्व खर्च धरणार : पंतप्रधान मोदी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 मार्च 2018

नवी दिल्ली ः केंद्र सरकार शेतीमालाचा हमीभाव ठरविताना शेतकऱ्यांना करावा लागणारा सर्व खर्च गृहीत धरणार आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी जमीन भाडे आणि व्याजासह सर्व खर्चांचा विचार हमीभाव ठरविताना सरकार करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

नवी दिल्ली ः केंद्र सरकार शेतीमालाचा हमीभाव ठरविताना शेतकऱ्यांना करावा लागणारा सर्व खर्च गृहीत धरणार आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी जमीन भाडे आणि व्याजासह सर्व खर्चांचा विचार हमीभाव ठरविताना सरकार करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

रविवारी (ता. २५) मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘२०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करताना सरकारने शेतीमालाला उत्पादनखर्चावर ५० टक्के नफा देणार असल्याचे जाहीर केले आहे. उत्पादनखर्च ठरविताना A2+FL किंवा C2 खर्च गृहित धरणार याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. A2+FL खर्चामध्ये बियाणे, कीडनाशके, खते, कामावर लावलेल्या मजुरांचा खर्च, इंधन आणि सिंचन आणि कुटुंबातील कामगारांनी केलेल्या कामाचा मोबदला याचा समावेश होतो. तर C2 मध्ये उत्पाद खर्च अधिक व्यापकपणे धरला जातो. यामध्ये स्थायी भांडवलावर भाड्यापोटी जाणारा खर्च आणि व्याजाचा समावेश आहे. 

‘‘सध्या सरकार रब्बीमधील ६ आणि खरिपातील १४ पिकांसाठी हमीभाव जाहिर करते.  सध्या सरकार हमीभाव ठरविता A2+FL खर्चाचा विचार करते. हा खर्च C2 पेक्षा खूपच कमी येतो. तसेच सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर  मिळावा यासाठी शेती सुधारणा मोठ्या प्रमाणात करत आहे. सरकार स्थानिक बाजारांना घाऊक आणि आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणार आहे. ‘ग्रामीण हाट’चा विकास करून त्यांना बाजार समित्यांशी जोडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकण्यासाठी दूर जावे लागणार नाही,’’ असेही ते म्हणाले.   

पंतप्रधान म्हणाले...

  •  शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध
  •  हमीभाव ठरविताना इतर खर्चासोबत जमीन भाडे आणि व्याज खर्चाचाही समावेश 
  •  शेती विकासासाठी शेती सुधारणांवर भर
  •  स्थानिक बाजारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणार
  •  ‘ग्रामीण हाट’ला बाजार समित्यांशी जोडणार

उत्पादन खर्चात या खर्चांचा समावेश
मजुरांचा खर्च, स्वतःच्या जनावरांवर होणार खर्च तसेच जनावरे आणि यंत्राचे भाडे, बियाणे खर्च, वापरलेल्या प्रत्येक प्रकारच्या खतांच्या खर्च, सिंचन खर्च, राज्य सरकारला दिलेला जमिनीचा महसूल, वापरातील भांडवलावर द्यावे लागणारे व्याज, जमीन भाडेपट्टीवर घेतली असल्यास त्याचे भाडे, याशिवाय स्वतःच्या शेतीत काम केलल्या शेतकऱ्याची किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याला कामात मदत केली त्यांचीही मजुरीही हमीभाव ठरविताना उत्पादन खर्चामध्ये गृहीत धरली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...