शेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात

``अनधिकृतपणे सावकारी व्यवसाय करणे गंभीर आहे. शासनाने या संदर्भात जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक उपनिबंधकांना कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यांनी अशा व्यक्ती शोधून काढल्या पाहिजेत. खासगी सावकारांकडून त्रास होत असलेल्या नागरिकांनी जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक उपनिबंधकांकडे तक्रार करावी.`` - लक्ष्मण राऊत, अपर
शेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात
शेतकऱ्यांपासून सगळेच सावकारी पाशात

मालेगाव : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांना आयुष्यातील स्थिरतेसाठी बेकायदा सावकारी फासाने जखडले आहे. सावकारी व्याजाचा धंदा गावागावांत व गल्ली-मोहल्ल्यांमध्ये बिनदिक्कतपणे सुरू आहे. वाढत्या गरजा भागविण्यासाठी तीन, पाच व दहा रुपये शेकडा व्याजाने पैसे देणाऱ्या प्रतिष्ठितांची संख्या हजारावर आहे. गुन्हेगार या व्यवसायात सक्रिय आहेत. दडपशाही, गुंडगिरी व आपली गरज भागविली आहे. या भीतीतून तथाकथित सावकारांविरुद्ध कोणीही आवाज उठवीत नाही.

खासगी सावकारी जाचाचे खरे बळी शेतकरी, कामगार व मध्यमवर्गीय आहेत. बॅंकांच्या कर्जापेक्षा खासगी व्याजाचे कर्जच शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असते. शेतीची कामे, मुलांचे शिक्षण, लग्न, आजारपण यासाठी तत्काळ पैसा उपलब्ध होतो. कागदपत्र, जामीनदार, तारण यांची डोकेदुखी नसते. त्यामुळे व्याजाने पैसे घेऊन गरजा भागविल्या जातात.

कामगार व झोपडपट्टी भागात या व्यवसायात मोठी उलाढाल होते. उत्पन्न कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती असल्याने वर्षानुवर्षे फक्त व्याजच दिले जाते. मुद्दल तसेच राहते. व्याजाच्या ओझ्याखाली असंख्य कुटुंबे चिंताग्रस्त आहेत. यातून सुटका करण्यासाठी प्रसंगी जमीन, प्लॉट, शेती, घर विकावे लागत आहे.

अशी होते सावकारी...

  •    धनदांडग्यांकडून बेकायदेशीरपणे व्याजाचा व्यवसाय सुरू.
  •     दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम असल्यास तीन रुपये व्याजदर.
  •     एक लाखासाठी पाच, सात व दहा रुपयांचा  व्याजदर.
  •     पैसे देतानाच सावकार व्याजाची रक्कम काढतात.
  •     वर्षासाठी व्याजाची रक्कम घेतली जाते.   
  •     झटपट पैशाच्या मोहाने व्यापारी व नोकरदारही सक्रिय.
  •     साध्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार लिहून कर्ज घेणाऱ्यांवर दहशत.
  •     जूनमध्येघेतलेल्या व्याजाच्या पैशांची दिवाळीत परतफेड.
  •     खासगी बेकायदा सावकारांची संख्या हजारावर, महिलाही सक्रिय.
  •     भिशीची जोड देऊन व्याजाचा व्यवसाय.
  •     दुर्घटना घडल्यास सावकारीची चर्चा, पुराव्याअभावी सुटका.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com