agriculture news in marathi, all over marathwada in Pre-monsoon rain | Agrowon

मराठवाड्यात पूर्वमोसमीची कमी-अधिक सर्वदूर हजेरी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जून 2018

औरंगाबाद : यंदा माॅन्सून आगमनापूर्वीच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील काही भागाचा अपवाद वगळता बहुतांश भागात पूर्वमोसमी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे पेरणीपूर्व मशागती, कपाशी लागवडीची तयारी, खते, बियाणे खरेदी आदी कामांना वेग आला आहे.

औरंगाबाद : यंदा माॅन्सून आगमनापूर्वीच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील काही भागाचा अपवाद वगळता बहुतांश भागात पूर्वमोसमी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे पेरणीपूर्व मशागती, कपाशी लागवडीची तयारी, खते, बियाणे खरेदी आदी कामांना वेग आला आहे.

मराठवाड्यातील एकूण ४२१ महसूल मंडळांपैकी जवळपास ३७५ महसूल मंडळात कमी अधिक प्रमाणात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण पेरणी वा लागवडीयोग्य नसल्याने त्याची तयारी मात्र बरा पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी चालविली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या तीन दिवसांत काही भागात सक्रीय असलेला पूर्वमोसमी पाऊस अलीकडच्या तीन दिवसांत उर्वरित भागात सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले.

तुरळक ठिकाणी पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी राहिल्याने जलसंधारणाच्या झालेल्या कामांमध्ये पाणी साठल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील पैठण, वैजापूर, बदनापूर, परतूर, अंबड, घनसावंगी, कळमनुरी, मुदखेड, भोकर, हदगाव,  गेवराई, वडवणी, माजलगाव आदी तालुक्‍यांत पावसाच जोर अधिक राहिला. पावसाच्या प्रमाणात मात्र असमतोल पाहायला मिळाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद व जालना तालुका वगळता पावसाचे पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण उर्वरित तालुक्‍यात बरे राहिले.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, खुल्ताबाद, सोयगाव, गंगापूर वगळता उर्वरित तालुक्‍यात पूर्वमोसमीची हजेरी पेरणीच्या तयारीला वेग देणारी राहिली. परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत आणि गंगाखेडचा काही भाग वगळता पूर्वमोसमी पावसाने दखलपात्र हजेरी लावली. परभणीच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यात पूर्वमोसमीचा जोर सर्वदूर राहिला. नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्‍यांपैकी मुखेड, धर्माबाद, बिलोली, देगलूर, माहूर, उमरी या तालुक्‍यांत अपवाद वगळात पूर्वमोसमीने केवळ तुरळक ते हलकी हजेरी लावली.

उर्वरित जिल्ह्यात मात्र पूर्वमोसमीचा जोर बरा राहिला. बीड जिल्ह्यातील परळी व बीड वगळता जवळपास सर्वच तालुक्‍यात हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील देवणी, निलंगासह चाकूर, औसा तालुक्‍याच्या काही भागात पावसाने लावलेल्या हजेरीने शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला गती देण्याचे काम सुरू केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही लोहारा व तुळजापूर तालुका वगळता जूनच्या पहिल्या सहा दिवसांत पावसाने कमी अधिक प्रमाणात वादळासह हजेरी लावून शेतकऱ्यांना मोसमी पावसाच्या आगमनाची चाहूल देण्याचे काम केल्याचे चित्र आहे.

दोन मंडळांत जोरदार पाऊस
बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी ६.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्‍यांतर्गत मगट मंडळात ८१ मिलिमीटर तर मोगाळी मंडळात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या ३.९ टक्‍के पाऊस पडल्याचे पावसाचे संकलित आकडे सांगतात.

सहा दिवसांत ७५ मिमी पाऊस
जूनच्या पहिल्या सहा दिवसांत पडलेल्या एकूण पावसाचा विचार करता मराठवाड्यातील २१ मंडळांत सहा दिवसांत एकूण ७५ मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे आकडे सांगतात. अर्थात, हा पाऊस एकाचवेळी पडला नाही. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील अंबड मंडळात ९८ मिलीमिटर, परभणी जिल्ह्यातील सावंगी म्हा. १०० मिलीमिटर, बामणी ९३, हत्ता ७५, नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर ८०, वजिराबाद ८३, तरोडा ७५, मुखेड तालुक्‍यातील मुखेड १०२, बारड ११३, भोकर तालुक्‍यातील मोगळी १८१, कंधार तालुक्‍यातील फुलवळ ७५, हदगाव तालुक्‍यातील आष्टी १०३, हिमायतनगर तालुक्‍यातील जवळगाव ९६, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यांतर्गत धोंडाराई १०३, अंबाजोगाई तालुक्‍यात अंबाजोगाई ९३, घाटनांदूर ८२, लोखंडी सावरगाव ९४, माजलगाव तालुक्‍यातील माजलगाव ७८, केज तालुक्‍यातील होळ ८३, लातूर जिल्ह्यातील निलंगा ८१, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्‍यांतर्गत भूम मंडळात सहा दिवसांत एकूण १०२ मिलीमिटर पाऊस पडला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यातील सहा दिवसांत पावसाचे प्रमाण खरीप पेरणीपूर्व कामांना गती देण्यापुरते मर्यादित आहे. पेरणीयोग्य पाऊस अजून झाल्याचे चित्र नाही. जोवर ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस होत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पावसाची कमी अधिक हजेरी लागत असली तरी त्यामधील खंड पेरणीला पोषक नाहीत. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याशिवाय पेरणी वा लागवडीचा निर्णय घेऊ नये.  
- डॉ. एस. बी. पवार, सहयोगी संचालक संशोधन राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद.

इतर ताज्या घडामोडी
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...