agriculture news in Marathi, all party leader appose to water release for Jayakwadi, Maharashtra | Agrowon

जायकवाडीला पाणी सोडण्याला नगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

पाणी सोडायला तालुरक्‍याचा विरोध नाही. मात्र अकोले तालुक्‍यात गंभीर दुष्काळ आहे. पाणी आमच्या तालुक्‍यात पडलं, पण आम्हीच, त्यापासून वंचित राहत आहोत. आता पाणी काढून घेणं म्हणजे येथील शेतकऱ्यावर दुहेरी अन्याय आहे. हा अन्याय शेतकरी सहन करणार नाही. अकोले तालुक्‍यात दुष्काळ जाहीर होईपर्यंत लढा सुरुच राहिल.''
- डॉ. अजित नवले, नेते किसान सभा तथा समन्वयक, शेतकरी संघर्ष समिती,

नगर ः समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नगर जिल्ह्यामधील भंडारदरा, मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याची तयारी सुरू आहे. मात्र, ‘‘नगर जिल्ह्यामध्येच तीव्र दुष्काळ असून, पाणी सोडू दिले जाणार नाही,’’ असा इशारा देत नगर जिल्ह्यामधील सर्वपक्षीय नेत्यांनी पाणी सोडण्याला जोरदार विरोध सुरू ठेवला आहे. त्यामुळे पाणी सोडण्यावरून नगर-मराठवाडा संघर्ष पेटणार आहे. यात प्रशासन आणि नेत्यांची मात्र गोची होत आहे.

नगर जिल्ह्यामधील भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणलोटातील पावसामुळे जायकवाडीत प्रकल्पात पाणी जमा होते. जायकवाडीत नाशिक जिल्ह्यातूनही पाणी जाते. यंदा नगर जिल्ह्यामध्ये पाऊस नाही. जोरदार पाऊस पडणाऱ्या अकोले तालुक्‍यातही यंदा पाऊस नाही. सुरवातीलाच झालेल्या पावसाने भंडारदरा, निळवंडे धरण भरले असले तरी मुळात फारसे पाणी साठले नाही. मात्र जायकवाडी धरणावरही मराठवाड्यातील मोठा भाग अवलंबून आहे. त्यामुळे पासष्ठ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणी असल्यास समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार जायकवाडीत पाणी सोडण्यात येते. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महमंडळाने जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने पाणी सोडण्याची तयारही केली आहे.

मात्र दरवेळीच पाणी सोडण्याचा विषय आला की मराठवाडा व नगर असा संघर्ष तयार होतो. ‘‘या वर्षी नगर जिल्ह्यामध्येही पाऊस नसल्याने दुष्काळाची गंभीर स्थिती आहे. जायकवाडीत सध्या पुरेसे पाणी असल्याने नगरमधून पाणी सोडण्याची गरज नाही,’’ असे सांगत नगर जिल्ह्यामधील नेत्यांनी पाणी सोडण्याला विरोध केला आहे. पाणी सोडणार असल्याचे कळताच नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी गुरुवारी मुळा धरणावर ठिय्या मांडून विरोध केला होता. याशिवाय शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनांना पाणी सोडण्याला विरोध केला आहे. कालच आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर तालुक्‍यातील अशोक नगर येथे रास्ता रोको अंदोलन केले.

भंडारदरातून पाणी सोडल्यास तीव्र लढा उभारणार असल्याचे अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वीच सांगितले होते. शनिवारी भंडारदरा धरणातून पाणी सोडत असल्याच्या निषेर्धार्थ अकोले येथे बंद पाळण्यात आला. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनीही पाणी सोडल्यास गंभीर परिणाम होतील, असे सांगितले आहे. शनिवारी राहात्यात शिवसेनेने पालकमंत्री राम शिंदे यांचा ताफा अडवला. त्यामुळे नगर जिल्ह्यामधील धरणातून पाणी सोडण्याला विरोध करत सगळेच नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे पाणी सोडतेवेळी संघर्ष होण्याची शक्‍यता आहे. सत्ताधारी नेत्यांची मात्र यामुळे गोची झाली आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...