agriculture news in marathi, all the political parties to ban for the water conservation | Agrowon

जलसाठा बंदीला सर्व राजकीय पक्षांचा विरोध
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

नाशिक : जायकवाडी धरणातील पाण्यासाठी ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात नवीन जलसाठे करण्यास बक्षी आयोगाने बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहेत. परिणामी, दिंडोरी, नाशिक आणि नगरच्या शेतकऱ्यांनी, नेत्यांनी एकत्रित येऊन न्यायालयीन लढाईबरोबरच जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : जायकवाडी धरणातील पाण्यासाठी ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात नवीन जलसाठे करण्यास बक्षी आयोगाने बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहेत. परिणामी, दिंडोरी, नाशिक आणि नगरच्या शेतकऱ्यांनी, नेत्यांनी एकत्रित येऊन न्यायालयीन लढाईबरोबरच जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाच्या नवीन अधिनियमानुसार विहिरीतील पाण्यालाही कर लावणार असून जायकवाडीच्या पाण्यासाठी आता नगर व नाशिक जिल्ह्यात कोणताही साठा करण्याचा अध्यादेश काढण्याचा शासन विचार करीत आहे. यावषी जलआराखाड्याचे काम बक्षी आयोगाकडे सोपावले होते. जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरून काढायची असेल तर ऊर्ध्व गोदावरी खोऱ्‍यात जलसाठे करू नये, जे पाणी पडते व जे पाणी धरणात आहे ते सगळे जायकवाडीपर्यत पोचवावे, असा बक्षी आयोगाच्या अहवालाचा आशय आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणीनियोजन व आगामी भुमिका याबाबत विचार करण्यासाठी शेतकऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बैठक झाली.

शेतीसाठी पाणी वापरात येणार नसेल, तर या  निर्णयाला विरोध झालाच पाहिजे, अशी भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी मांडली.
आपल्या शेतात कोणत्या पिकाची लागवड करायची, हे शासनाच्या धोरणानुसार ठरवावे लागणार असून विहीर, विंधनविहिर खोदण्यासाठीही शासनाची परवानगी घेत पाण्याचा महसूलही भरावा लागणार आहे. याबाबत शासनाने नव्याने भूजल अधिनियमन आणले असून या निर्णयास शेतकऱ्यांनी विरोध करावा, असे आवाहन आ. झिरवाळ यांनी केले.

नाशिकसह नगर जिल्ह्यातही येऊ घातलेल्या या पाणीसंकटाला तोंड देण्यासाठी पूर्ण ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात आंदोलन उभे करण्याचे महाले यांनी जाहीर केले. चर्चेत भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, मनसे या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

 
 

इतर बातम्या
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी...अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही...
निताने येथे वीजवाहक तारांच्या... नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील...
'वसाका'ची चाके पुन्हा फिरणारनाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव''...
‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया...अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून...
अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात...अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या...जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यतासांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन...नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती...
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान :...सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या...
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...