बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सदैव दक्ष राहा : कृषी आयुक्त

बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सदैव दक्ष राहा
बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सदैव दक्ष राहा

नांदेडः कपाशीवरील गुलाबी बोंड अळीसह इतर किडींच्या प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांना सर्तक करण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदैव दक्ष राहावे, असे निर्देश राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.

रविवारी (ता. २९) दुपारी नांदेड येथे जिल्ह्यातील पीक परिस्थिती, किड, रोग स्थितीबाबत कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये श्री. सिंह बोलत होते. या वेळी लातूर येथील कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग, डॉ. अरविंद पंडागळे, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. व्ही. भरगंडे आदीची उपस्थिती होती.

श्री. सिंह म्हणाले, क्राॅपसॅपअंतर्गत निवड केलेल्या गावातील प्लाॅट निरीक्षणे फोटोसहीत आॅनलाइन पद्धतीने नोंदवावित. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्याचे आढळून आल्यास शेतकऱ्यांना तत्काळ पीक संरक्षक उपयोजना करण्याचा सल्ला द्यावा. जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांखालील क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी सहायकांनी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी फळे, भाजीपाला, फूलशेती, मसालावर्गीय पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करून तांत्रिक मार्गदर्शन करावे. शेतकरी गटांमार्फत शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योग, विक्री साखळी निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. गटशेती योजनेची प्रभावी अंमलबजाणी करावी. जलयुक्त शिवार अभियानामुळे निर्माण झालेल्या संरक्षित पाणीसाठ्याचा ठिबक, तुषारद्वारे कार्यक्षम वापर करावा, असेही श्री. सिंह यांनी सांगितले.

श्री. चलवदे यांनी सादरीकरण केले. तत्पूर्वी डाॅ. बेग, डाॅ. पंडागळे यांनी कीड व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, आत्माअंतर्गतचे मिळून एकूण ४५० कर्मचारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com