agriculture news in marathi, Amaravati loksabha election | Agrowon

अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढत
विनोद इंगोले
सोमवार, 25 मार्च 2019

अमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या आनंदराव अडसूळ यांच्या नावाविषयीची अनिश्‍चिता पहिल्याच यादीत संपली. त्यानंतर आता संयुक्‍त पुरोगामी आघाडीने नवनीत राणा यांना समर्थन दिल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातील लढत दुहेरीच होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. 

अमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या आनंदराव अडसूळ यांच्या नावाविषयीची अनिश्‍चिता पहिल्याच यादीत संपली. त्यानंतर आता संयुक्‍त पुरोगामी आघाडीने नवनीत राणा यांना समर्थन दिल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातील लढत दुहेरीच होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. 

आनंदराव अडसूळ यांच्यावर ‘मातोश्री’ नाराज असल्याची चर्चा उठली होती. दोन वेळा त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढत संसेदत प्रतिनिधित्व केले. या वेळी ‘मातोश्री’च्या नाराजीमुळे तिसऱ्यांदा त्यांना तिकीट मिळेल किंवा नाही; याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. परंतु आनंदरावांचा समावेश शिवसेनेच्या पहिल्याच यादीत करण्यात आला आणि साऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दुसरीकडे लोकसभेसाठी युवा स्वाभिमानीनेदेखील तयारी चालविली होती.

युवा स्वाभिमानीच्या नेत्या नवनीत राणा यांना संयुक्‍त पुरोगामी आघाडी समर्थन देईल; अशी चर्चा आधीपासूनच होती. त्यानुसार शनिवारी (ता. २३) मुंबईतील पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबतच्या अनिश्‍चिततेलाही ‘फुलस्टॉप’ लागला. त्यामुळे आता शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ तर दुसरीकडे आघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आक्रमकता दोन्ही बाजूने असल्याने या निवडणुकीत नेमके कोणते मुद्दे उदयास येतात, हा कुतूहलाचा विषय ठरणार आहे. सोमवारी (ता. २५) आनंदराव अडसूळ तर मंगळवारी (ता. २६) नवनीत राणा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

नवनीत राणा यांनी यापूर्वी एक अर्ज दाखल केला आहे. दिवंगत राज्यपाल रा. सू. गवई यांच्या सहचारिणी कमलताई गवई यांनी नवनीत राणा यांच्यासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारला होता. परिणामी दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने त्यांच्या लढतीमुळे रंगत येणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...