agriculture news in marathi, Ambalika sugar factory, Ajit pawar | Agrowon

अरे बाबांनो, तुमची झोपमोड केली नाही : अजित पवार
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

नगर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच्या मोटारीऐवजी काल रात्री वेगळ्या वाहनातून अंबालिका कारखान्यावर आले. त्यांची नेहमीची मोटार नसल्याने प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविले. मात्र, पवार यांनी आपली परीक्षा घेतल्याचे कळताच त्यांना हायसे वाटले. त्याच वेळी त्यांनी आंदोलनस्थळी चक्कर मारली. मात्र, आंदोलक गाढ झोपेत होते. सकाळी आंदोलक भेटायला आल्यानंतर ते म्हणाले, "अरे बाबांनो, मी रात्रीच तुम्हाला भेटायला आलो होतो; पण तुमची झोपमोड केली नाही...! 

नगर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच्या मोटारीऐवजी काल रात्री वेगळ्या वाहनातून अंबालिका कारखान्यावर आले. त्यांची नेहमीची मोटार नसल्याने प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविले. मात्र, पवार यांनी आपली परीक्षा घेतल्याचे कळताच त्यांना हायसे वाटले. त्याच वेळी त्यांनी आंदोलनस्थळी चक्कर मारली. मात्र, आंदोलक गाढ झोपेत होते. सकाळी आंदोलक भेटायला आल्यानंतर ते म्हणाले, "अरे बाबांनो, मी रात्रीच तुम्हाला भेटायला आलो होतो; पण तुमची झोपमोड केली नाही...! 

कर्जत तालुक्‍यात ऊसदरावरून शेतकरी संघटनेने अंबालिका साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आंदोलक व कारखान्याचे जनरल मॅनेजर एस. बी. शिंदे यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली. याबाबत माहिती मिळताच पवार रात्रीच कारखाना कार्यस्थळावर आले. आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी रात्रीच ते गेले. मात्र, त्या वेळी आंदोलक झोपेत असल्याने, त्यांनी आज "अंबालिका'च्या सभागृहात बैठक घेतली. 

अजित पवार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर "जिल्ह्यातील सर्व कारखाने ठरवतील त्यानुसार आम्हीही उसाचे पहिले पेमेंट देण्यास बांधील आहोत. लवकरच पहिले पेमेंट जाहीर करू,' अशी ग्वाही "अंबालिका'चे जनरल मॅनेजर एस. बी. शिंदे यांनी दिली. तसे पत्र त्यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कालपासून "अंबालिका'समोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज मागे घेतले. मात्र, आश्‍वासनानुसार कार्यवाही न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही 
"सध्या फक्त सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ऊसदर जाहीर झाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतील दर जाहीर होणे बाकी आहे. ते जाहीर होऊ द्या; मी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही प्रथम शेतकरी आहोत, नंतर राजकारणी,'' अशा शब्दांत पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...