agriculture news in marathi, america_china trade war | Agrowon

अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर परिणाम
वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे अमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये व्यापार युद्ध (ट्रेड वॉर) छेडले गेले आहे. अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर जबर आयात कर लावले आहेत. अमेरिकेतून त्या वस्तूंची आयात बंद व्हावी, हा त्यामागचा हेतू आहे. त्याला उत्तर म्हणून चीननेही अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या शेतमालावर (कापूस, सोयाबीन इ.) २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापार युद्धाचा भारतीय बाजारपेठेवरही मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

कापूस

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे अमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये व्यापार युद्ध (ट्रेड वॉर) छेडले गेले आहे. अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर जबर आयात कर लावले आहेत. अमेरिकेतून त्या वस्तूंची आयात बंद व्हावी, हा त्यामागचा हेतू आहे. त्याला उत्तर म्हणून चीननेही अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या शेतमालावर (कापूस, सोयाबीन इ.) २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापार युद्धाचा भारतीय बाजारपेठेवरही मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

कापूस

 • भारत हा अमेरिकेच्या खालोखाल जगात दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश आहे.
 • चीन दरवर्षी साधारण ५० लाख गाठी कापूस आयात करतो. त्यातील सुमारे ४० टक्के वाटा अमेरिकेचा.
 • चीनने अमेरिकेतून कापूस आयातीवर २५ टक्के शुल्क लावले आहे. 
 • त्यामुळे भारतासाठी चीनला कापूस निर्यात करण्याची मोठी संधी.
 • चीनमध्ये भारतातून आयात होणाऱ्या कापसावर कोणतेही शुल्क नाही. त्यामुळे अमेरिकेच्या तुलनेत भारतीय कापूस स्वस्त पडेल.
 • सध्या भारतातून चीनला सहा ते सात लाख गाठी कापसाची निर्यात. परंतु पूर्वी भारताने ४० लाख गाठींच्या घरात कापूस निर्यात केलेला आहे.

 सोयाबीन

 • चीन अमेरिकेकडून ९३४ लाख टन सोयाबीन आयात करतो.
 • व्यापारयुद्धामुळे ही आयात मार खाईल. तिथेही भारताला मोठी संधी आहे.
 • चीनने भारतीय सोयापेंड आयातीवर घातलेले निर्बंध उठवल्यास भारत चीनला मोठा पुरवठा करू शकतो.
 • निर्बंध उठवावेत म्हणून वाणिज्य मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू.
 • चीनमध्ये पशुखाद्य आणि कोंबडीखाद्यात वापरल्या जाणाऱ्या सोयापेंडचा पुरवठा करण्याची भारताला मोठी संधी.
 • तसेच चीन ज्या देशांना थोडक्या प्रमाणात सोयापेंड निर्यात करत होता त्या जपान, दक्षिण कोरिया व व्हिएतनामची बाजारपेठही भारताला खुली होण्याची शक्यता.

इतर अॅग्रोमनी
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...
हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...
ग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...
युरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...
मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...