agriculture news in Marathi, American cotton crop pink boll worm free, Maharashtra | Agrowon

अमेरिकेची कापूस शेती झाली बोंड अळीमुक्त !
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

मुंबई ः अमेरिकेच्या कापूस शेतीवर गुलाबी बोंड अळीने मागील काही वर्षे जोरदार आक्रमणे केले होते. येथील सरकार आणि संस्थांनी योग्य उपाययोजना करून नियंत्रण केले. त्यामुळे जवळपास शतकानंतर अमेरिकेतील कापूस शेती बोंड अळीमुक्त झाली आहे, अशी घोषणा अमेरिकेच्या कृषी विभागाने दिली. 

मुंबई ः अमेरिकेच्या कापूस शेतीवर गुलाबी बोंड अळीने मागील काही वर्षे जोरदार आक्रमणे केले होते. येथील सरकार आणि संस्थांनी योग्य उपाययोजना करून नियंत्रण केले. त्यामुळे जवळपास शतकानंतर अमेरिकेतील कापूस शेती बोंड अळीमुक्त झाली आहे, अशी घोषणा अमेरिकेच्या कृषी विभागाने दिली. 

देशातील बोंड अळीच्या स्थितीविषयी माहिती देण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या अहवालात अमेरिकेचे कृषी सचिव सोन्नी पेर्ड्यू म्हणाले, की अमेरिकेच्या कापूस शेतीत गुलाबी बोंड अळीने जवळपास १०० वर्षे प्रादुर्भाव केला होता. बोंड अळीच्या नियंत्रणासाठी देशातील शेतकऱ्यांना दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत होता. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत असत. आता शेतकऱ्यांचा हा खर्च वाचणार आहे. सरकारी संस्था आणि शेतकऱ्यांनी योग्यवेळी योग्य त्या उपाययोजना केल्याने बोंड अळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आता अमेरिकेच्या सरकारने कापूस शेतीत गुलाबी बोंड अळीचा धोका नसल्याचे म्हटले आहे. 

अमेरिकेत सर्वांत प्रथम हेअरेन येथे १९१७ साली गुलाबी बोंड अळीची नोंद झाली. अळीची ओळख करून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. परंतु, अनेक वर्षे प्रादुर्भाव वाढतच होता. त्यानंतर दर वर्षी येथील शेतकऱ्यांना बोंड अळीचा सामना करावा लागत असे. सरकारी संस्थांनी अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून योग्य वेळी योग्य उपाययोजना देशभर राबविण्यात आल्या. त्याचा परिणाम म्हणून आता अमेरिकेतून गुलाबी बोंड अळी हद्दपार झाली आहे.  

सर्वप्रथम १९१७ मध्ये नोंद
अमेरिकेत सर्वांत प्रथम हेअरेन येथे १९१७ साली गुलाबी बोंड अळीची नोंद झाली. तसेच, १९५० च्या मध्यात टेक्सासमध्ये बोंड अळी आढळली. बोंड अळीने शेजारच्या राज्यांमध्ये प्रवेश केला आणि वाढत गेली. बोंड अळी १९६३ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये पोचली. त्यानंतर बोंड अळी देशभर पसरत गेली. सुरवातीच्या काळात अळीवर नियंत्रण मिळविणे कठीण गेले. अळीची ओळख करून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. 

जागतिक कापूस उत्पादन घटणार
ब्रिटन येथील कॉटन आउटलुक या संस्थेने २०१८-१९ मध्ये जागतिक कापूस उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे. सप्टेंबरमध्ये जाहीर केलेल्या २६.३९ दशलक्ष टनांवरून २६.३७ दशलक्ष टन कापूस उत्पादन होईल, असा अंदाज कॉटन आउटलुकने जाहीर केला आहे. आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये उत्पादनात वाढ होणार आहे, तर पाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांमध्ये उत्पादन घटणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...
`महानंद'मधील गैरव्यवहाराची चौकशी सुरूमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ अर्थात...
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही...कोल्हापूर : उर्वरित एफआरपीबाबत साखरेची मागणी...
उसाला प्रतिटन २०० ते २२५ अनुदान मिळणार...नवी दिल्ली : साखर कारखान्यांन्या साखरेच्या...
संत्रा, मोसंबी नुकसानीचा अहवाल द्या ः...नागपूर ः संत्रा, मोसंबी पिकांचा बहुवार्षिक पिकात...
शाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर...सौर कृषिपंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच...
स्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...
मातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...
साखरेच्या विक्री दरात क्विंटलला २००...नवी दिल्ली : साखर विक्रीचा दर २९०० वरून ३१००...
काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात 'सीआरपीएफ'...श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "...
एक रुपयाची लाच घेतल्यास भ्रष्ट...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुण नियंत्रण विभागात...
सांगलीत दुष्काळाच्या तीव्रतेत वाढसांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
शेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...
फूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...
`पॉलिहाउस, शेडनेटधारकांना कर्जमुक्ती...नगर : सरकारची धरसोडीची धोरणे, दुष्काळ,...