agriculture news in marathi, American fall armaverm tree found on the paddy | Agrowon

सिल्लोड तालुक्‍यात मक्यावर आढळली अमेरिकन फॉल आर्मीवर्म अळी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : दुष्काळात उपलब्ध पाण्याच्या भरवशावर कशीबशी रब्बीची मका करावी म्हटलं, तर त्यावरही आता अमेरिकन फॉल आर्मीवर्म अर्थात स्पोडेप्टोरा फ्रुगीपर्डा या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सिल्लोड तालुक्‍यात आढळून आलेल्या प्रादुर्भावाची तज्ज्ञांनी मंगळवारी (ता. ३०) पाहणी करीत शेतकऱ्यांना त्यावरील उपाय सुचविले.

औरंगाबाद : दुष्काळात उपलब्ध पाण्याच्या भरवशावर कशीबशी रब्बीची मका करावी म्हटलं, तर त्यावरही आता अमेरिकन फॉल आर्मीवर्म अर्थात स्पोडेप्टोरा फ्रुगीपर्डा या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सिल्लोड तालुक्‍यात आढळून आलेल्या प्रादुर्भावाची तज्ज्ञांनी मंगळवारी (ता. ३०) पाहणी करीत शेतकऱ्यांना त्यावरील उपाय सुचविले.

यंदा दुष्काळामुळे मराठवाड्यात रब्बीची आशा मावळली आहे. खरिपाच्या उत्पादनात मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांना उर्वरित साल कसं धकवावं, असा प्रश्न आहे. जनावरांच्या चाऱ्यासोबतच पाण्याचा प्रश्न भीषण रूप धारण करण्याची क्षमता आहे. जनावरांना चारा व्हावा व थोडं अर्थार्जन व्हावं म्हणून सिल्लोड तालुक्‍यातील आमठाणा शिवारातील शेतकऱ्यांनी रब्बी मकाची लागवड केली आहे. परंतु या मक्यावर अमेरिकन फॉल आर्मीवर्म (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे.

माहिती मिळाल्यानंतर औरंगाबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, कीटकशास्त्रज्ञ डॉ. एन आर. पतंगे, रामेश्वर ठोंबरे आदींनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह आमठाणा येथील पांडुरंग कदम यांच्या प्रादुर्भावग्रस्त मका पिकाची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांना या किडीच्या जीवनचक्राची माहिती कीटकशास्त्रज्ञ डॉ. पतंगे यांनी दिली.

या अळीची पिढी अंडी, अळी, कोष व पतंग अशा अवस्थेतून पूर्ण होते. एक पतंग साधारणत: एका रात्रीत शंभर किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकतो. रात्रीच्या वेळी ही अळी मक्याची पाने खाऊन दिवसा पोंग्यात लपून बसते. मका निघाल्यानंतर खोल नांगरट करावी. गंध सापळ्यांचा वापर करावा. प्रादुर्भाव आढळल्यास प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून पाच टक्‍के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करावा, असा सल्ला डॉ. पतंगे यांनी दिला.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...