अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि आवक स्थिर

अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि आवक स्थिर
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि आवक स्थिर

अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली. सद्यस्थितीत एक हजार क्‍विंटलखाली ही आवक असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. येत्या काळात आवक वाढणार असल्याचे संकेत असले, तरी दर मात्र गेल्या महिनाभरापासून स्थिर आहेत. 

अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाट परिसरात भुईमूग घेतला जातो. त्यासोबतच लगतच्या मध्य प्रदेश भागातील भैसदेहीसारख्या गावशिवारातही भुईमूग लागवड होते. या भागातून उत्पादित भुईमूग विक्रीसाठी अमरावती बाजारपेठेत आणला जातो, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. सद्यस्थितीत भुईमूग शेंगांची आवक अवघी ७८६ क्‍विंटलची आहे. 

येत्या काळात आवक एक हजार क्‍विंटलचा टप्पा पार करेल, असा विश्‍वास व्यापाऱ्यांनी व्यक्‍त केला. गेल्या महिनाभरापासून बाजारात भुईमूग शेंगांचे दर ४५०० ते ५२०० रुपयांवर स्थिर आहेत. त्यात वाढीची शक्‍यता तूर्तास नसल्याचेही सांगण्यात आले. आवक वाढल्यास त्याचा दरावर परिणाम होऊ शकतो. बाजारात तुरीची देखील नियमित आवक असून, सरासरी २ हजार क्‍विंटलपर्यंतची ती असल्याचे सांगण्यात आले. 

तुरीचे दर ५००० ते ५६५० रुपये क्‍विंटलचे आहेत. आठवडाभरापासून तुरीचे दर स्थिर आहेत. तुरीची आवक २१०३ क्‍विंटलची आहे. हरभरा गेल्या आठवड्यात ४०५० ते ४२३७ रुपये क्‍विंटल होता. या आठवड्यात हे दर ४००० ते ४१७५ रुपयांवर खाली आले. हरभऱ्याची आवक २४१२ क्‍विंटलची आहे. बाजारात सोयाबीनचीही नियमित आवक असून, ती २३९३ क्‍विंटलची आहे. सोयाबीनचे दर ३२०० ते ३५४३ रुपये असे आहेत. सोयाबीन दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत अल्पशी वाढ नोंदविण्यात आली. 

बाजारात ४२७ क्‍विंटल इतक्‍या गव्हाची आवक होत आहे. गव्हाला १९२५ ते २८०० रुपये क्‍विंटलचा दर असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात गव्हाचे दर सरासरी इतकेच होते. गव्हाच्या दरात अल्पशी वाढ किंवा घट नोंदविली जाते. कापसाची आवक नसली, तरी दर ६००० ते ६३२५ रुपये क्‍विंटल असे दर आहेत. मुगाची आवक सहा पोत्यांची असून, ५००० ते  ६२०० रुपये क्‍विंटल असे दर स्थिर असल्याची माहितीही व्यापाऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com