agriculture news in Marathi, anevari bellow 50 paise in solapur district, Maharashtra | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५ गावाची रब्बी हंगामातील पिकांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे दस्तुरखुद्द जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता स्पष्ट झाली आहे. पण जिल्हा प्रशासन अजूनही दुष्काळाच्या बाबतीत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. 

गेल्या आठवड्यापर्यंत टॅंकरची संख्या शंभरावर पोचली आहे. आणखी मागणी होते आहेच, तर मुक्‍या जनावरासाठी सुरू करावयाच्या चारा छावण्यांचे १५० प्रस्ताव पडून आहेत. पण त्याबाबत अद्यापही काहीच हालचाली दिसत नाहीत. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५ गावाची रब्बी हंगामातील पिकांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे दस्तुरखुद्द जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता स्पष्ट झाली आहे. पण जिल्हा प्रशासन अजूनही दुष्काळाच्या बाबतीत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. 

गेल्या आठवड्यापर्यंत टॅंकरची संख्या शंभरावर पोचली आहे. आणखी मागणी होते आहेच, तर मुक्‍या जनावरासाठी सुरू करावयाच्या चारा छावण्यांचे १५० प्रस्ताव पडून आहेत. पण त्याबाबत अद्यापही काहीच हालचाली दिसत नाहीत. 

उन्हाळ्याची तीव्रता वाढते आहे, तसे पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न अगदीच गंभीर झाला आहे. चारा छावण्याचे १५० प्रस्ताव प्रशासनाकडे पडून आहेत, नियम, अटींमध्ये ते अडकले आहेत. त्यातच आता आणेवारीचा हा अहवाल तयार झाला आहे. जिल्हा प्रशासनाने आणेवारीचा हा अहवाल आता विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे आता शासनाकडून काय निर्णय होणार आणि शेतकऱ्यांना काय मदत मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. 

दरवर्षी १५ मार्चला पीक कापणी अहवालानुसार जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर केली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार १४५ गावांची अंतिम आणेवारी जाहीर झाली आहे. यंदा वरुणराजाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यावर सुरवातीपासूनच दुष्काळाचे संकट ओढवले आहे. सरासरीच्या केवळ ३८ टक्के इतकाच पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 

पावसाअभावी खरिपाबरोबरच रब्बी हंगामही वाया गेला. शासनाने खरीप हंगामात बार्शी व उत्तर सोलापूर तालुका वगळता उर्वरित नऊ तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर केला. या तालुक्‍यातील दुष्काळग्रस्तांना शासनाकडून मदतीचे वाटप सुरू आहे. आता रब्बी हंगामातील पिकांचीही आणेवारी जाहीर झाली असून, यात बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील गावांचाही समावेश आहे. पण आधीच्याच मदतीपासून हे दोन्ही तालुके अद्यापही वाऱ्यावरच आहेत. पण एकूण पाणी, चाऱ्याची उपलब्धता याचा विचार करता याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचेच दिसून येते.

दुष्काळ महत्त्वाचा की निवडणुका
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू आहेत. पण लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सध्या सगळी यंत्रणा अडकल्याने या विषयाकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. लोकप्रतिनिधींचे हात आचारसंहितेच्या नावाखाली बांधले गेले आहेत. दुष्काळ जाहीर होऊन आज जवळपास साडेपाच महिन्यांचा कालावधी उलटतो आहे, पण त्याच्या उपायाच्या अंमलबजावणीबाबत मात्र प्रचंड उदासीनता प्रशासनात दिसून येते आहे. त्यामुळे दुष्काळ महत्त्वाचा की निवडणुका हे ठरवण्याची वेळ आली आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...