बुलडाणा : भाजीपाल्यास कमी दर मिळत असल्याच्या निषेधार्थ देऊळगावमही येथे शुक्रवारी (ता. ३०) शेतकऱ्यांनी भाजीपाला मोफत वाटला.
बुलडाणा : भाजीपाल्यास कमी दर मिळत असल्याच्या निषेधार्थ देऊळगावमही येथे शुक्रवारी (ता. ३०) शेतकऱ्यांनी भाजीपाला मोफत वाटला.

भाव नसल्याने निषेध म्हणून भाजीपाला वाटला मोफत

बुलडाणा : सध्या भाजीपाल्याला दर अत्यंत कमी मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहेत. या परिस्थितीला शासकीय धोरणे जबाबदार असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी देऊळगावराजा तालुक्‍यातील देऊळगावमही येथे शुक्रवारी (ता. ३०) शेतकऱ्यांनी भाजीपाला मोफत वाटला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ संघटक बबन चेके, जिल्हा सरचिटणीस शेख जुल्फेकार शेख यासीन, सिंदखेडराजा विधान सभाध्यक्ष मधुकर शिंगणे, तालुकाध्यक्ष गणेश शिंगणे, कुंडलिक शिंगणे, गजू रायते, संतोष शिंगणे, वसंतराव दहातोंडे, सचिन साळवे, अंबादास बुरुकुल, अरुण परिहार, विठ्ठल भोरजे, ज्ञानेश्‍वर चाळगे, राम कुटे, राजू मुजमले, समाधान शिंगणे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या भागात भाजीपाला उत्पादकांनी गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो, कोबी व इतर भाजीपाला दर नसल्याने बाजारात नेणे बंद केले. तोडणीसाठी लागणारा खर्चसुद्धा निघत नसल्याने काहींनी भाजीपाल्यावर नांगर फिरवला. शेतकऱ्याच्या आजच्या परिस्थितीला सरकारची धोरणे कारणीभूत असल्याने याचा निषेध या वेळी घोषणा देत कार्यकर्त्यांनी केला. देऊळगावमही परिसरात नागरिकांना बोलावून मोफत भाजीपाला नेण्याची विनंती केली जात होती. या अभिनव आंदोलनामुळे एकच चर्चा सुरू होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com