संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला ठोकले टाळे !

संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला ठोकले टाळे !
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला ठोकले टाळे !

पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा आल्याच्या निषेर्धात माजलगाव (जि. बीड) येथील संतप्त शेतकऱ्यांनी येथील कार्यालयाला टाळे ठोकले आहे. 

शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. हवामान विभागाच्या चुकीच्या माॅन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला असून, पिक विम्याचे देखील हजाराे काेटी रुपये मिळत नसल्याचा आराेप या शेतकऱ्यांनी केला आहे.  माजलगाव (जि.बीड) येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पुण्यातील हवामान विभागाच्या कार्यालयाला साेमवारी (ता.१५) टाळे ठाेकुन ठिय्या आंदाेलन केले.यावेळी हवामान विभागाच्या निषेधार्थ घाेषणा दिल्या. विमा कंपन्या शेतकऱ्यांसाेबत दगाबाजी करत आहे. हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे लागेबंधे असल्याचा आराेप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com