agriculture news in Marathi, Anil Deshmukh says, farmers problem increased, Maharashtra | Agrowon

सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली भरः अनिल देशमुख 
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 मे 2019

नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या लाभापासूनही शेतकरी वंचित आहेत, पीकविम्याचा लाभ देण्यातही सरकार असमर्थ ठरले. आता पीककर्जाच्या उद्दिष्टात कपात करून शेतकऱ्यांच्या समस्यात भर टाकण्याचे काम सरकारने केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.

नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या लाभापासूनही शेतकरी वंचित आहेत, पीकविम्याचा लाभ देण्यातही सरकार असमर्थ ठरले. आता पीककर्जाच्या उद्दिष्टात कपात करून शेतकऱ्यांच्या समस्यात भर टाकण्याचे काम सरकारने केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.

नागूपर जिल्ह्यात मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येते. परंतु सध्या ही बॅंक डबघाईस आली आहे. यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांचा एकमेव आधार शेतकऱ्यांना उरला आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आपली कर्ज वितरणाची प्रक्रिया नाहक किचकट करून ठेवली आहे. आवश्‍यकता नसतानाही विविध कागदपत्रांची मागणी त्यांच्याकडून केली जाते. यामुळे हवालदील झालेला शेतकरी खासगी सावकारांकडे जातो. असे असताना बॅंकांच्या अपयशाचे खापर नाबार्डने शेतकऱ्यांवर फोडत या वर्षी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट कमी केले आहे. अशीच परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्यात आहे.

पीककर्ज वाटपाबाबत गेल्या वर्षी देखील उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. ते पूर्ण करण्यात बॅंका अपयशी ठरल्या, त्यामुळे देखील पीककर्ज उद्दिष्ट या वर्षी कमी केल्याचे सांगीतले जाते, असेही अनिल देशमुख यांनी प्रसद्धी पत्रकात म्हटले आहे. या वर्षीची परिस्थिती लक्षात घेता या वर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक राहणार आहे. कर्ज जर वेळेवर मिळाले नाही तर शेती पडीक राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा होण्यासाठी तालुकास्तरावर कर्ज मेळावे घेण्यात यावे. कर्जमेळाव्यांसाठी नियोजन करावे, परंतु याकडेही राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

इतर ताज्या घडामोडी
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजनग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...
जळगावात भाजीपाला आवकेत घटजळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
पुणे जिल्ह्यात २२० हेक्टरवर भातपीक...पुणे  ः यंदाच्या खरिपात भात उत्पादनवाढीसाठी...
टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे...पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी...
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...