agriculture news in Marathi, Anil ghanwat says, sugarcane council on tomorrow in sangali | Agrowon

सांगलीत उद्या ऊस परिषद ः अनिल घनवट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

सांगली ः सन २०१७-१८ च्या गळित हंगामात उसाला पहिली उचल किती मिळावी, ऊस खरेदी धोरण कसे असावे, साखर उद्योगाबाबत सरकारची भूमिका काय असावी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेने बुधवारी (ता. ८) सांगली येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये दुपारी दोन वाजता ऊस परिषद आयोजित केली आहे. याबाबत चर्चा करून ऊसदर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

सांगली ः सन २०१७-१८ च्या गळित हंगामात उसाला पहिली उचल किती मिळावी, ऊस खरेदी धोरण कसे असावे, साखर उद्योगाबाबत सरकारची भूमिका काय असावी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनेने बुधवारी (ता. ८) सांगली येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये दुपारी दोन वाजता ऊस परिषद आयोजित केली आहे. याबाबत चर्चा करून ऊसदर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी संजय कोले, मुसा देसाई, सीमाताई नरोडे उपस्थित होते. अनिल घनवट म्हणाले, ‘‘महाराष्ट्राप्रमाणे गुजरात मध्येसुद्धा सहकारी साखर कारखानेच आहेत. गुजरातमध्ये एकही खासगी कारखाना झाला नाही. सर्व कायदे, कर, साखरेची किंमत सारखीच असताना गुजरातमधील साखर कारखाने सांगली, कोल्हापूरमधील साखर कारखान्यांपेक्षा १००० ते १५०० रुपये प्रतिटन जास्त दर देतात व उर्वरित महाराष्ट्रापेक्षा २००० ते २५०० रुपये प्रतिटन जास्त दर देतात. कारखान्यांत राजकारण होत नाही. व्यवसायिक पद्धतीने साखर कारखाने चालवले जातात.

रंगराजन समितीने ऊस उत्पादक व साखर कारखान्यांमध्ये, साखरेच्या किमतीच्या ७०% उसाला व ३०% कारखान्याला अशी शिफारस केली होती; परंतु गुजरात पॅटर्नप्रमाणे असे दिसते, की १००% साखरेचे पैसे शेतकऱ्यांना देता येतात. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये राजकारणाचा प्रभाव व भ्रष्ट प्रशासन शेतकऱ्यांचे शोषण करत आहे. साखर कारखान्यांमधील स्पर्धाच उसाला योग्य भाव देऊ शकेल. शेतकऱ्यांनी ऊस तोडणीची घाई न करता जास्त दर देणाऱ्या विश्वासार्ह कारखाण्यांना ऊस देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...