agriculture news in Marathi, animal census start in status, Maharashtra | Agrowon

राज्यात अखेर पशुगणनेस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पुणे : विविध तांत्रिक अडथळे पार करत पशुधनाची आॅनलाइन गणना अखेर सुरू झाली आहे. देश पातळीवर एकाच वेळी होणारी ही २०वी गणना टॅबद्वारे होत असून, जानेवारीअखेर राज्यातील पशुधनाची जातिनिहाय नेमकी आकडेवारी समोर येणार आहे. ही आकडेवारी भविष्यातील पशुधनाच्या विविध योजनांसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

पुणे : विविध तांत्रिक अडथळे पार करत पशुधनाची आॅनलाइन गणना अखेर सुरू झाली आहे. देश पातळीवर एकाच वेळी होणारी ही २०वी गणना टॅबद्वारे होत असून, जानेवारीअखेर राज्यातील पशुधनाची जातिनिहाय नेमकी आकडेवारी समोर येणार आहे. ही आकडेवारी भविष्यातील पशुधनाच्या विविध योजनांसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

पशुधनाची बिनचूक आकडेवारी उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने टॅबद्वारे गणना करण्याचा निर्णय घेतला. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मोठ्या प्रमाणावर निधीदेखील राज्यांना दिला. या गणनेसाठी राज्यांना टॅब खरेदी करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र राज्य शासनाने कोणतीही इलेक्ट्रॉनिक खरेदी राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान महामंडळाद्वारे आॅनलाइन पद्धतीने करण्याची अट घातल्यामुळे टॅबची बाजारपेठेतील किंमत आणि सरकारच्या वेबसाइटमधील किमतीमध्ये मोठी तफावत होती. यामध्ये राज्य सरकारचे दर अधिक होते. या तांत्रिक कारणांनी टॅब खरेदी बरोबर पशुगणना रखडली होती. 

मात्र यानंतर या समस्येवर तोडगा निघत बाजारभावाच्या दराने ७ हजार १२६ टॅब पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे खरेदी करण्यात आले. या टॅबच्या इंटरनेटसाठी सिम कार्डदेखील खरेदी करण्यात आले असून, त्याचा पुरवठा झाला आहे. बहुतांश ठिकाणी गणना सुरू झाली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे सांगण्यात आले. जानेवारीअखेर पशुगणना होऊन अचूक आकडेवारी उपलब्ध होईल, असा विश्‍वास पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी व्यक्त केला. 

स्पर्धात्मक दरांतून ८० लाख रुपयांची बचत 
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्रत्येक टॅबसाठीच्या सिम कार्डसाठी प्रतिमहिना ५०० रुपयांचा निधी मंजूर केला होता. तीन महिन्यांसाठी १ हजार रुपये ५०० रुपये या दराने १ कोटी ६ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर होता. मात्र राज्यात विविध विभागांतील इंटरनेट सेवांचा वेग ध्यानात घेता विविध कंपन्यांना पाचारण करण्यात आले होते. यांच्यातील स्पर्धात्मक दराने तीन महिन्यांसाठी केवळ ३७५ रुपये दराने ४ जी स्पीडची सिम कार्ड खरेदी केली. या स्पर्धात्मक दराने शासनाची ८० लाखांची बचत करण्यात आली, असे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी सांगितले.

इतर बातम्या
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...