agriculture news in marathi, animal health program to implement by pune zilla parishad, maharashtra | Agrowon

कासदाह निर्मूलनासाठी पुणे 'झेडपी' राबवणार कार्यक्रम
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कासदाह अाजारामुळे दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. बहुतांश पशुपालकांना या आजाराच्या उपचारांविषयी माहिती नसते. जनजागृती, योग्य वेळी उपचारांसाठी कासदाह निर्मूलन हा कार्यक्रम हाती घेण्यात आला अाहे.

- डॉ. श्रीराम पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पुणे.

पुणे : दुभत्या जनावरांमध्ये कासदाह आजार मोठ्या प्रमाणात अाढळून येत आहे. यामुळे जनावरांच्या कासेवर परिणाम होऊन दूध उत्पादनात घट होते. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने यंदापासून कासदाह निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. श्रीराम पवार यांनी दिली.  

कासदाह हा जिवाणूजन्य आजार असून, तो दुभत्या जनावरांमध्ये आढळून येतो. जनावराची धार काढल्यानंतर ते लगेच खाली बसते. त्या वेळी गोठ्यातील जमिनीवर असलेले रोगकारक जीवाणू जनावरांच्या सडातून आत प्रवेश करतात. दुभत्या जनावरांच्या ज्या सडात जीवाणू पसरतात त्यातून दूध येणे बंद होते. एका सडातून दूध येणे बंद झाले तरी २५ टक्के दूध उत्पादनाला फटका बसतो. वेळीच निदान व उपचार झाल्यास या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. 

कासदाह निर्मूलन कार्य्रकमासाठी जिल्हा परिषदेने यंदाच्या अंदाजपत्रकात ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पशुजन्य उत्पादनांसाठी नवीन ब्रॅंड विकसित करणे, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या पशुधन विकास कार्यक्रमासाठीही दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली अाहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...