agriculture news in marathi, animal husbandary, wrong artificial insemination case in solapur | Agrowon

चुकीचे कृत्रिम रेतन करणारा पशुधन पर्यवेक्षक निलंबित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात काम करणारे सहायक पशुधन विकास अधिकारी भरत माने हे सतत गैरहजर राहत असल्याने आणि चुकीच्या पद्धतीने कृत्रिम रेतन केल्याचा ठपका ठेवत पशुधन पर्यवेक्षक मोहन चौधरी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी त्यांना निलंबित केले आहे. दोन्हीही अधिकारी, कर्मचारी उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अनुक्रमे बीबी दारफळ व अकोलेकोटी येथे कार्यरत आहेत. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात काम करणारे सहायक पशुधन विकास अधिकारी भरत माने हे सतत गैरहजर राहत असल्याने आणि चुकीच्या पद्धतीने कृत्रिम रेतन केल्याचा ठपका ठेवत पशुधन पर्यवेक्षक मोहन चौधरी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी त्यांना निलंबित केले आहे. दोन्हीही अधिकारी, कर्मचारी उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अनुक्रमे बीबी दारफळ व अकोलेकोटी येथे कार्यरत आहेत. 

श्री. माने हे बीबी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे कार्यरत असताना ते नियमित गावामध्ये येत नसल्याची तक्रार सुरेश साठे यांनी केली होती. त्यांनी दारूच्या नशेत दिलेल्या चुकीच्या उपचारामुळे गाय खाली झाल्याचेही श्री. साठे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. गावच्या सरपंचांनीही श्री. माने हे गावात येत नसल्याची तक्रार केली होती. या सगळ्या तक्रारींचा विचार करून श्री. माने यांना निलंबित करण्याचे आदेश डॉ. भारुड यांनी दिले. मोहन चौधरी हे सध्या वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे कार्यरत आहेत. ते बीबी दारफळ येथे कार्यरत असताना अकोलेकाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी शाहू लामकाने यांच्या खिलार जातीच्या गाईला कृत्रिम रेतन केले होते. खिलारचे रेतन करण्याऐवजी त्यांनी जर्सीचे रेतन केले. परिणामी, जर्सी जातीच्या वासराने जन्म घेतला. श्री. चौधरी यांच्याकडून झालेली चूक त्यांनी कबूल केली. मात्र, त्या शेतकऱ्याचे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. यावरून श्री. चौधरी यांनी गैरशिस्तीचे वर्तन केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...