agriculture news in marathi, animal husbandry student agitaion on Status Co | Agrowon

पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात न्यायाधिकरणाने दिला ‘स्टेटस-को’
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मार्च 2019

नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना वर्ग-१ पदी देण्यात आलेल्या पदोन्नतीप्रकरणात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणने (मॅट) ‘जैसे थे''चे (स्टेटस-को) आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुुरू असलेले पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे आंदोनल मागे घेण्यात आले आहे. याप्रकरणी ३ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार असून पशुधन सहायक या वेळी आपली बाजू मांडतील. 

नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना वर्ग-१ पदी देण्यात आलेल्या पदोन्नतीप्रकरणात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणने (मॅट) ‘जैसे थे''चे (स्टेटस-को) आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुुरू असलेले पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे आंदोनल मागे घेण्यात आले आहे. याप्रकरणी ३ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार असून पशुधन सहायक या वेळी आपली बाजू मांडतील. 

राज्यात १२५ पशुधन सहायकांना पशुधन विकास अधिकारीपदी नियुक्‍ती देण्यात आली होती. पशुधन सहायक हे पद दहावी नंतर दोन वर्षांचा डिप्लोमा करणाऱ्यांसाठी आहे. त्यामुळे साडेपाच वर्षांचा पशुविज्ञान अभ्यासक्रम पूर्ण करून प्रवेश प्रक्रिया देत राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत नंतर पशुधन विकास अधिकारी होणाऱ्यांवर हा अन्याय असल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात पशुविज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आठवडाभरापासून विविध प्रकारचे आंदोलन केली. त्याची दखल घेतली जात नसल्याने या विरोधात न्यायाधिकरणामध्ये याचिका दाखल करण्यात आली. 

न्यायाधिकरणाने याचिकेची दखल घेत याप्रकरणात परिस्थिती ‘जैसे थे'' ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा विद्यार्थ्यांचा मोठा विजय मानला जात आहे. १२५ पैकी केवळ ८ ते १०  पशुधन सहायकांनीच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे उर्वरित पशुधन सहायकांना न्यायाधिकरणाच्या आदेशामुळे आता पदभार स्वीकारता येणार नाही. दरम्यान, पशुसंवर्धन सचिव अनुपकुमार यांनी पदोन्नती नियमानुसार असल्याचे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांना लेखी कळविले होते. याप्रकरणी ३ एप्रिल रोजी सुनावणी होणार असली तरी न्यायाधिकरणाने दिलेला स्टेटस-को (जैसे थे आदेश) आचारसंहितेपर्यंत राहणार आहे.

पशुधन सहायकाकरिता पदोन्नतीसाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून स्वतंत्र कॅडर निर्माण करावे. ज्याप्रमाणे आरोग्य विभागात परिचारिका (नर्स), सहायक परिचारिका, वरिष्ठ परिचारिका अशी पदोन्नती दिली जाते. आजपर्यंत कोणत्याही परिचारिकेला किती वर्षाची सेवा दिली तरी डॉक्‍टर म्हणून मान्यता दिली जात नाही. मग पशुंच्या आरोग्य क्षेत्रात असे का घडावे ?''
- तेजस वानखडे, अध्यक्ष, महाराष्ट्र पशुविज्ञान शाखा विद्यार्थी संघटना.

परिचारिकेला डॉक्‍टरचा दर्जा आरोग्य सेवेत मिळत नसताना मग पशुआरोग्य क्षेत्रात असे का घडावे ? हा सोपा आमचा प्रश्‍न आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठविला आहे. न्यायाधिकरणाने आमच्यावरील अन्यायाची दखल घेत आम्हाला न्याय दिला. न्यायपालिकेवर आमचा विश्‍वास असून यापुढील कायदेशीर लढाईदेखील आम्हीच जिंकू.
- डॉ. चेतन अलोने

पदोन्नतीसाठी कॅडर एक सारखे असणे गरजेचे आहे. परंतु, पशुधन विकास अधिकारीपदी पदोन्नतीसाठी मात्र निकष डावलण्यात आले आहेत. पशुधन सहायक ते थेट डॉक्‍टर अशी पदोन्नती कशी दिली जाऊ शकते. सर्वसामान्य सुशिक्षितांनी देखील ही बाब अन्यायकारक असल्याचे चटकन लक्षात येईल.
- डॉ. अक्षय बिंड

इतर अॅग्रो विशेष
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...