agriculture news in Marathi, Anjangsagarjuri and Nandgaon clandeshwar have suddenly turned to Talukderdi near Nafed | Agrowon

अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी बंद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के शेतकऱ्यांकडूनच तुरीची खरेदी करण्यात आली. त्यानंतर नाफेडने अचानक खरेदी बंद केल्याचा प्रकार अंजनगावसूर्जी व नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यांत घडला आहे. 

अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के शेतकऱ्यांकडूनच तुरीची खरेदी करण्यात आली. त्यानंतर नाफेडने अचानक खरेदी बंद केल्याचा प्रकार अंजनगावसूर्जी व नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यांत घडला आहे. 

अंजनगावसूर्जी बाजर समिती परिसरात खरेदी विक्री संघाने ६ मार्चपासून तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणीस सुरवात केली. २० मार्चपर्यंत ३१९३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शनिवार (ता. १८ मे) पर्यंत त्यापैकी केवळ ६६६ शेतकऱ्यांच्या ८६५८.१० क्‍विंटल इतक्‍याच तुरीचे मोजमाप करून त्याची खरेदी करण्यात आली. त्यानंतर मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता नाफेडकडून अचानक खरेदी बंद करण्यात आली. परिणामी नोंदणी केलेल्या इतर शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. 

विशेष म्हणजे जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांच्या तुलनेत अंजनगावसूर्जी तालुक्‍यात तूर खरेदीची प्रक्रिया उशिरा राबविण्यात आली. तरीही अवघ्या १२ दिवसांत ३१९३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. अंजनगावप्रमाणेच नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यावरही नाफेडकडून अन्याय करण्यात आला आहे. या ठिकाणी १४ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन नोंदणीस सुरवात झाली. २० मार्चपर्यंत तालुक्‍यातील ३६६३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यानंतर टोकन देऊन तूर मोजमाप व खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांना एस.एम.एस. देण्यात आले. शनिवार (ता. १८ मे) पर्यंत ३६६३ पैकी केवळ ३८० शेतकऱ्यांकडील ५२९७ क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. उर्वरित ९० टक्‍के शेतकरी तूरखरेदीच्च्या प्रतीक्षेत आहेत.

खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांची नाफेडच्या पैशावर भिस्त होती. तूर विक्रीनंतर आलेल्या पैशातून हंगामाची सोय ते करणार होते. परंतु नाफेडने खरेदीच बंद केल्याने नवे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...