पावसाळ्यातही अंजनी तलाव कोरडा

पावसाळ्यातही अंजनी तलाव कोरडा
पावसाळ्यातही अंजनी तलाव कोरडा

सावळज, जि. सांगली ः पूर्व भागात सावळजसह काही गावांत पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष चालू आहे. सावळज, अंजनी, वडगाव, नागेवाडी, लोकरेवाडी, गावांना अंजनी तलावातून पाणीपुरवठा होतो. हा तलाव ७४ :१४ द.ल.घ.फु. क्षमतेचा आहे. हा तलाव मार्चपासून कोरडा आहे. तलावातून गावांना होणारा पाणीपुरवठा ठप्प आहे. परिणामी, नागरिकांसह जनावरांच्या चारा-पाणीप्रश्न उभा आहे. काही गावांत ग्रामपंचायती स्वतःच्या तर खासगी बोअरने पाणीपुरवठा करीत आहेत.

एकीकडे पर्जन्यअभाव व दुसरीकडे म्हैशाळचे तलावात टाकण्यात येणारे पाणी थकीत बिलपोटी दीर्घकाळ बंद आहे. परिणामी, तलावात पाणी कुठून येणार हा प्रश्न आहे. पावसाअभावी भागात जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळला कडबा विकत घेऊन जनावरांना घालावा लागत असल्याने शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात भुर्दंड बसत आहे. केवळ ७ किमी अंतरावर असणाऱ्या गव्हाण बंधाऱ्यात म्हैशाळचे वारंवार पाणी सोडण्यात येते. मात्र अंजनी तलावात पाणी सोडण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

जनावरांचा प्रश्‍न गंभीर गव्हाण भागातील शेतीला मुबलक पाणी मिळत आहे, तर दुसरीकडे सावळज पूर्व भागात पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. अद्याप एकदाही म्हैशाळचे पाण्याने तलाव अर्धाही भरण्यात आलेला नाही. त्यामुळे सावळज पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा, पाणीप्रश्न डोके वर काढत आहे.

अंजनी तलावातून अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा होतो. परंतु तलाव कोरडा असल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प आहे. गव्हाण बंधाऱ्यातून अंजनी तलावात म्हैशाळचे पाणी टाकून तलाव भरावा. थकीत बिल शासनाने भरावे. - अनिल शिंदे, माजी शिवसेना, तालुका प्रमुख, तासगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com