अंकलगी तलाव आटू लागला

जत पूर्व हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. पाण्यासाठी प्रशासनाने वेळेवर उपाययोजना आखली पाहिजे. - रोहिदास सातपुते, उमदी, ता. जत.
अंकलगी तलाव आटू लागला
अंकलगी तलाव आटू लागला

सांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या अंकलगी साठवण तलावात एक महिना पुरेल इतका पाणीसाठा आहे. भविष्यात जत पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पाण्यासाठी आतापासून भटकंती सुरू झाली आहे. 

जत पूर्व भागातील अंकलगी साठवण तलावातून मागील चार महिन्यांपासून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्‍यात ६८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यापैकी ४१ टॅंकरमध्ये पाणी भरण्यासाठी अंकलगी तलावातून पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज होणाऱ्या लाखो लिटर पाणी उपशामुळे सध्या एक महिना पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा अंकलगी तलावातील पाणीसाठा मृतसंचयाखाली जत पूर्व भागात पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई जाणवणार आहे.

अंकलगी तलावात पाणी भरून देण्यासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी भरून दिले जात अाहे. वीज नसेल तर इंजन व जनरेटरद्वारे पाणी भरले जात आहे. पाणीपातळी दररोज खालावत चालली आहे.  महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या पूर्वीच्या विजापूर व आताच्या विजयपूर जिल्ह्यात टॅंकर भरता यावेत, यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. जत पूर्व भागात तेथून टॅंकर भरणे सोईचे होईल. हा या मागचा प्रशासनाचा हेतू आहे. याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, यावर सारे अवलंबून आहे. 

४० टॅंकरनी पाणीपुरवठा   यंदा अंकलगी तलाव जत पूर्व भागासाठी वरदान ठरला. मागील चार महिन्यांपासून हा तलाव दुष्काळग्रस्तांची तहान भागवत आहे. तलावातून ४० टॅंकरने संख, उमदी, माडग्याळ, कोंतेयबोबलाद, जाडरबोबलाद, गुड्डापूर, दरीबडची, दरीबडची लमाणतांडा, उटगी, तिल्याळ, सोन्याळ, तिकोंडी, आसंगी जत, करेवाडी, सोनलगी, दरीकोनूर, पांढरेवाडी, बेळोडगी, खंडनाळ, बालगाव, गिरगाव, जाळीहाळ बुद्रुक, सोर्डी, लकडेवाडी, भिवर्गी, लवंगा, सिद्धनाथ, माणिकनाळ, कागणरी, मोरबगी, हळ्ळी, बोर्गी बुद्रुक, धुळकरवाडी व जालिहाळ खुर्दला पाणीपुरवठा सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com