agriculture news in marathi, Anna Hajare on hunger for Lokpal and MSP, Maharashtra | Agrowon

लोकपाल, हमीभावासाठी अण्णांचा रामलीलावर एल्गार
वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत लोकपालची अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी केली नाही. या मागण्यासांठी जष्ठ सामजसेवक अण्णा हजारे हे शुक्रवार (ता. २३) पासून येथील रामलीला मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत लोकपालची अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी केली नाही. या मागण्यासांठी जष्ठ सामजसेवक अण्णा हजारे हे शुक्रवार (ता. २३) पासून येथील रामलीला मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  

उपोषणाला बसण्यापूर्वी अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून आंदोलन करतोय. आंदोलनावेळी कधीही, कुठलाही हिंसाचार झालेला नाही. पण हे सरकार रामलीला मैदानावर आंदोलनासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बसेस, रेल्वे रोखत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे. आमच्या आंदोलनात अडथळे आणले जात आहेत. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. 

‘‘आंदोलनात येणाऱ्या लोकांशी गैरवर्तणूक केली जात आहे. त्यांना आंदोलनात येण्यापासून रोखले जात आहे. आमच्या आंदोलनात खोडा घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. देश व लोकशाहीसाठी भगतसिंग यांनी बलिदान दिले. इंग्रज गेले पण देशात लोकशाही काही अजून आलेली नाही. त्यांचे लोकशाहीचे स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण हे सरकार आमचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही भगतसिंगांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत आमच्या आंदोलनात कधीच हिंसाचार झालेला नाही. पण सरकारला काय अनुभूती आली काय माहीत असा सवाल उपस्थित करत आमच्या लोकांच्या बसेस आणि रेल्वे रोखण्यात येत असल्याचा आरोप केला. लोकशाहीसाठी हे ठीक नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आंदोलनाला सुरवात करण्यापूर्वी अण्णा हजारे यांनी राजघाट येथील महात्मा गांधीजींच्या समाधिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर आंदोलनाला सुरवात केली. तसेच अण्णांनी आंदोलन थांबवावे, यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले होते. मात्र देशात चार वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसताना आता पोकळ आश्वासनांचा काय उपयोग, असे सुनावत अण्णांनी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले होते.

इतर अॅग्रो विशेष
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...