agriculture news in marathi, Anna Hazare criticizes Central Government on farmers issue | Agrowon

सरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची चिंता : हजारे
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जानेवारी 2018

सातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारला उद्योगपतींची चिंता आहे, शेतकऱ्यांची नाही, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केला. मी शेतकऱ्यांसाठी देशभर फिरत असून, शेती मालाला खर्चावर आधारित हमीभाव मिळालाच पाहिजे, त्यासाठी २३ मार्चला दिल्लीत आंदोलन करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारला उद्योगपतींची चिंता आहे, शेतकऱ्यांची नाही, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केला. मी शेतकऱ्यांसाठी देशभर फिरत असून, शेती मालाला खर्चावर आधारित हमीभाव मिळालाच पाहिजे, त्यासाठी २३ मार्चला दिल्लीत आंदोलन करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव (जि. सातारा) येथे भारतीय जनसंसद संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) आयोजित जाहीर सभेत अण्णा हजारे बोलत होते. ते म्हणाले, की संपूर्ण भारतभर माझे दौरे सुरू आहेत. ओडिशापासून सुरवात केली. या सभा निवडणूक लढण्यासाठी मते मागण्यासाठी नाहीत. कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, या सरकारला उद्योगपतींची चिंता आहे, शेतकऱ्यांची नाही. स्वातंत्र्यानंतर किती उद्योगपतींच्या आत्महत्या झाल्या. म्हणून देशभर मी फिरतोय ते आम्ही शेतकऱ्यांना शेतीमालाला खर्चावर आधारित हमीभाव मिळवा. त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय.

श्री. हजारे म्हणाले, की कृषिमूल्य आयोग निर्माण केला आहे, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी सर्व पिकांचा भाव काढून तो केंद्राला पाठवतात, तेथे एसीमध्ये बसून ४० ते ५० टक्के कपात करून शेतीमूल्य ठरवतात. तुम्हाला हा अधिकार कुठून आला. शेतीचे बजेट वाढवत नाहीत. पण उद्योगावरील बजेट वाढत आहे. शेतीचा विकास होत नाही, बॅंक शेतकऱ्याला कर्ज देत नाही, दिले तर चक्रवाढ व्याज लावतात. म्हणून सर्वोच न्यायालयाने आदेश केले आहेत, चक्रवाढ व्याज लावू नका, पण कोणी लक्ष देत नाही. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...