दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कॉर्नेली मिन्नार यांनी कीटकां
ताज्या घडामोडी
राळेगणसिद्धी, जि. नगर : "सातत्याने खोट्या आरोपांद्वारे मला व आंदोलनाला संघाशी जोडून विविध मार्गांनी वारंवार बदनामी करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. वारंवार होणाऱ्या या बदनामी विरोधात न्यायालयात दावा दाखल करणार आहे,'' असे अण्णा हजारे यांनी येथे स्पष्ट केले.

हजारे यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ""मला व माझ्या आंदोलनास बदनाम करण्यासाठी आंदोलनामधील एक कार्यकर्त्या कल्पना इनामदार या नथुराम गोडसे यांची नात असल्याच्या आणि त्यांच्या हाती या आंदोलनाची सर्व सूत्रे हजारे यांनी सोपविल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांत पसरविल्या जात आहेत. वास्तविक इनामदार यांचा व माझा पूर्वी कधीच परिचय नव्हता. आंदोलनापूर्वी विविध राज्यांतील नवीन जे कार्यकर्ते पुढे आले त्यातील इनामदार एक होत्या. त्यांच्याकडे आंदोलनाचे कोणतेही सूत्र सोपविले नव्हते. समन्वय समितीमधील कार्यकर्त्यांना आंदोलनाची जी कामे विभागून दिली त्यानुसार इनामदार यांना मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी दिली होती एवढेच.''
""या आंदोलनाची सर्व सूत्रे मी स्वत: हाताळीत होतो. मात्र, आंदोलन बदनाम करण्याच्या हेतूने केलेल्या कटकारस्थानामुळे इनामदार यांना गोडसेंशी जोडले गेले. तसेच त्यांना आंदोलनाचे मुख्य सूत्रधार करून माझा संघाशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे, हे पूर्णतः खोटे आहे. सोशल मीडियावर काही मंडळी मुद्दामहून त्यावर चर्चा करून माझी व आंदोलनाची बदनामी करीत आहेत,'' असे हजारे यांनी म्हटले आहे.
- 1 of 351
- ››